टीम मंगळवेढा टाईम्स ।
जानेवारीत झालेल्या चार वाळू घाटांचा जिल्हा प्रशासनाने पुन्हा लिलाव काढला असून संबंधित ठेकेदारांना त्यांनी भरलेले २५ टक्के रक्कम परत मिळणार आहे.
दि.१३ ते २६ एप्रिल दरम्यान वाळू ठेकेदारांना लिलावात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.
जानेवारीत झालेला लिलाव रद्द करण्याची मागणी करत कोर्टात गेलेल्या चार वाळू ठेकेदारांना त्यांनी भरलेले २५ टक्के रक्कम अर्थात १८ कोटी रक्कम परत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित ठेकेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लिलावात सहभाग घेणाऱ्या ठेकेदारांना लिलाव अंतिम झाल्यानंतर भरावयाच्या एकूण रकमेत पूर्वीची रक्कम वजा करण्यात येणार आहे.
म्हणजे ज्यांनी २५ टक्के रक्कम भरली होती, त्यांना सदर रक्कम हमखास मिळणार आहे. लिलावात सहभाग न घेतल्यांनाही सदर रक्कम परत करण्यात येणार आहे. जानेवारीत नियमानुसार वाळू लिलाव झाले होते.
या लिलावात चार वाळू घाटांचा लिलाव निश्चित झाला. याच दरम्यान राज्य शासनाकडून वाळूबाबत नवीन धोरण जाहीर झाले. नवीन धोरणानुसार प्रतिब्रास वाळूची अपसेट प्राईस ६५० इतकी निश्चित झाली.
यापूर्वी ४२०० इतकी अपसेट प्राइस होती. त्यामुळे ज्यांनी वाळू लिलाव घेतला , त्यांनी नवीन धोरणानुसार वाळू लिलाव पुन्हा घ्या , अशी मागणी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे केली.
याबाबतचा प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाकडे पाठवून दिला. वाळू लिलाव रद्द करता येत नसल्याचे कारण राज्य शासनाने सांगितले. त्यानंतर वाळू ठेकेदार कोर्टात गेले.
जानेवारीत झालेला वाळू लिलाव रद्द करून नवीन धोरणानुसार वाळू लिलाव करा अन्यथा आम्ही भरलेले १८ कोटी रुपये आम्हाला परत करा , अशी मागणी ठेकेदारांनी केली होती.ठेकेदारांची मागणी राज्य शासनाने मान्य केली आहे.
या चार वाळू घाटांचा पुन्हा लिलाव
जानेवारीत झालेल्या लिलावात लाइफस्टाइल कंपनीने अर्धनारी-बठाण येथील साठा एक साठी सर्वात जास्त बोली लावली होती.
शासकीय बोली ६.९३ कोटी किंमत असताना २१ कोटी ३३ लाख रुपये बोली लावून या वाळू साठ्याची मालकी मिळवली होती.
तर साठा क्रमांक -२ साठी आरबी इंटरप्राईजेसने ६.९ ० कोटी किंमत असताना २९ .३० कोटी रुपयांची बोली निश्चित झाली होती.
“रघुनाथ नागणे यांच्या कंपनीने बठाण क्रमांक तीन आणि अर्धनारी घाट क्रमांक एक साठी बोली लावली होती. बठाण क्रमांक ३ साठी १४ कोटी ८० लाख तर अर्धनारी घाट नंबर १ साठी ११ कोटी ९ ० लाखांची बोली लावून लिलाव घेतला होता.
नवीन धोरण जाहीर झाल्यानंतर चारही लिलाव रद्द झाले. आता या चार घाटांचा लिलाव पुन्हा सुरू झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज