टीम मंगळवेढा टाईम्स ।
मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या कडून खंडणी घेणे किंवा त्यांना जीवे ठार करण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणे प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात तिघा जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेची तातडीने दखल घेत मोहोळ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना ता 18 नोव्हेंबर रोजी मोहोळ परिसरात घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, माजी आमदार रमेश कदम यांची मुलगी सिद्धी रमेश कदम हिला मोहोळ विधानसभा मतदार संघाची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडुन उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव सिद्धीची उमेदवारी रद्द करण्यात आली.
त्यामुळे ता. 5 नोहेंबर रोजी रमेश कदम यांचे कार्यालयाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक घेवून सिध्दी कदम हिची उमेदवारी बदल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी महायुतीचे उमेदवार यांना पाठींबा देण्याचे ठरविले होते.
दरम्यान ता. 6 नोहेंबर रोजी कदम यांचे कार्यालयात आलेल्या एका अनोळखी इसमास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण पथकांने पकडुन त्याचे कडून बनावट पिस्तुल जप्त करून त्याचे विरूध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
तेव्हापासून कार्यकर्त्याना धमकीचे फोन येत असल्याने मला पोलीस संरक्षण मिळावे यासाठी ता. 17 नोहेंबर रोजी जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे अर्ज केला होता. दरम्यान त्याच दिवशी रोजी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान विधानसभा निवडणुक प्रचाराच्या अनुषंगाने उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीकडे निघत असतांना मला अनोळखी मोबाईल नंबर वरून फोन आला.
नमुद मोबाईलच्या वापरकर्त्याने तो माझा कार्यकर्ता असल्याचे सांगुन मला सांगितले की, काही लोकांकडुन तुमच्या जिवाला धोका आहे. याबाबत त्याच्याकडे रेकॉर्डीग आहे. असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने त्याच नंबर वरून माझे नंबरवर व्हॉटसपव्दारे एक व्हिडीओ, ऑडीओ रेकॉर्डीग पाठविली.
त्यामध्ये पांढरे रंगाचे शर्टाचा मनगटाजवळील भाग दिसत आहे. त्यामध्ये मला उचलुन अपहरण करून पुणे येथे नेणेबाबत व त्या मोबदल्यात पैसे देणेबाबत संभाषण असल्याचे दिसुन आले. त्यानंतर काही वेळाने एक ऑडीओ रेकॉर्डींग पाठविली त्यामध्ये एक इसम त्याची गँग असल्याचे सांगत असुन गँगचे पैसे मागत आहे.
समोरचा इसम रिव्हॉल्वर, गाडी व पैसे हे कामासाठी देण्याबाबत व काम झाले नंतर त्याचा मोबदला म्हणून पैसे देणे बाबत संभाषण आहे. सदर घटणे बाबत पोलीसांना माहीती दिली असता पोलीसांनी तातडीने त्या मोबाईल नंबरचा वापरकर्ता बाबासाहेब गुंड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सदरचे रेकॉडींग हे त्यास दुसऱ्या मोबाईल धारक आकाश श्रीकांत बाबर, याने पाठविले असल्याचे सांगितले.
त्यामुळे आकाश श्रीकांत बाबर, (वय-29), रा. पोखरापुर, ता.मोहोळ याचेकडे चौकशी करून त्याचा साथीदार धनराज अविनाश भोसले (वय-26), रा.पोखरापुर, ता.मोहोळ याना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांना आबासाहेब काशीद याने आकाश व धनराज यांना मोहोळ, सोलापूर या ठिकाणी भेटुन माझेकडुन खंडणी स्वरूपात पैसे उकळण्याचे उद्देशाने, मला उचलून माझे अपहरण करून पुणे येथे घेवुन जाणार असल्याचे समजले.
हे राजकारण असु शकते. माझ्या राजकीय भुमिकेमुळे अनेकांना अडचण आली असावी. या सर्व प्रकारामागचा मास्टर माईंड कोण आहे याचा पोलीसांनी तपास करणे गरजेचे आहे- रमेश कदम, माजी आमदार, मोहोळ
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज