टीम मंगळवेढा टाईम्स।
विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव आणि विठ्ठल कारखान्याच्या थकीत ऊस बिलामुळे गेल्या काही महिन्यांपासून भगीरथ भालके सतत नॉटरिचेबल असतात.
काहीतरी करून विठ्ठल कारखान्याला कर्ज मिळवण्याची त्यांची धडपड सुरु आहे. बारामतीच्या मोठ्या साहेबांपर्यंत पोहोचले.
मात्र मार्ग काही निघाला नाही. इकडे सरकोलीच्या घरापर्यंत शेतकरी येत आहेत. त्यात विरोधकांपेक्षा पक्षातीलच नेत्यांकडून पोलखोल सुरु झाल्याने ते वैतागून गेले आहेत.
म्हणून ते सतत नॉटरिचेबल असतात. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या धर्मपत्नी डॉ.प्रणिता भालके या सध्या तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत चर्चेत येत आहेत.
क्रिकेट स्पर्धा असो, विकासकामांचे उद्घाटन असो अथवा तालुक्यातील कोणत्याही सुख-दुःखाच्या कार्यक्रमाला त्या आवर्जून हजेरी लावत आहेत.
त्यामुळे सध्या भगीरथ भालके मतदारांपासून अलिप्त राहत असले, तरी त्यांच्या पत्नी मतदारांशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पती अडचणीत असताना त्यांना साथ देण्यासाठी पदर खोचून पायाला भिंगरी बांधून फिरणाऱ्या या नवदुर्गेच्या कामाचे कौतुक होत आहे.(स्रोत:लोकमत)
विठ्ठल कारखाना बंद सभासदांची मदार खासगी कारखान्यावर; थकीत बिलाची मात्र प्रतीक्षाच
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद असल्याने या कारखान्याच्या सभासदांना शेतकऱ्यांना इतर खाजगी तसेच सहकारी साखर कारखान्यांना ऊस गाळपासाठी पाठवावा लागत आहे.
मात्र विठ्ठल कारखाने थकीत ऊस बिल अद्याप दिलेले नाहीय त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील अर्थकारणात विठ्ठल कारखान्याची नेहमीच महत्वाची भूमिका राहिलेले आहे.आर्थिक अडचणी तसेच इतर कारणामुळे हा कारखाना यंदा बंद आहे. यंदा दिवाळी सणातही शेतकऱ्यांची बिले मिळू शकले नाहीत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज