टीम मंगळवेढा टाईम्स ।
सरकार आरक्षण देत नाही. त्यामुळे दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च झेपत नाही, अशी चिठ्ठी लिहून लाडसावंगी (ता.छत्रपती संभाजीनगर) येथील अल्पभूधारक शेतकरी बाबासाहेब जनार्दन पडूळ (४७) यांनी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या बाबासाहेब पडूळ केली.
गुरुवारी (२७ जून) सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली. पडूळ यांच्याकडे २० गुंठे जमीन आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजता ते शेतात गुरांना चारापाणी करण्यासाठी गेले होते.
काम आटोपल्यावर त्यांनी शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्यांचे चुलते रामू पडूळ हे शेतात गायीचे दूध काढण्यासाठी गेले, त्या वेळी ही घटना उघड झाली.
पुतण्याने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरडा केला. त्या वेळी शेतकऱ्यांनी धाव घेत बाबासाहेब पडूळ यांना घाटी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. केवळ २० गुंठे जमिनीवर उदरनिर्वाह आणि दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण झाले होते.
चिट्ठीतील मजकूर असा
‘एक मराठा लाख मराठा… मागील आठ महिन्यांपासून हे सरकार मराठा आरक्षण देत नाही, अर्धा एकर शेताच्या उत्पन्नावर दोघांच्या शिक्षणाचा खर्च, घर चालवण्याचा खर्च भागत नाही. साहिल, मला माफ कर,’ असा मजकूर पडूळ यांनी चिठ्ठीत लिहिला होता.
मुलास बारावीत ८५ टक्के
पडूळ यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगी बीसीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे, तर मुलगा नुकताच ८५ टक्के मिळवून बारावी उत्तीर्ण झाला आहे. संभाजीनगरात अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला त्याचा प्रवेश करण्याचे पडूळ यांचे नियोजन होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज