मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
हद्दीतून अन्न धान्याची खासगी वाहने जात होती, त्यावर कारवाई न करण्यासाठी मोहोळचे तात्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या नावाने २५ हजारांची लाच मागणाऱ्या एका खासगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. दाजीसाहेब श्रीमंत काकडे असे अटक करण्यात आलेल्या खासगी इसमाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १५ ते १७ जून २०२३ या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये यातील तक्रारदार व त्यांचे मित्राचे दुकानातील धान्य, गहू, ज्वारी व तांदूळ असलेले टैम्पो, छोटा हत्ती अशी वाहने मोहोळ हद्दीतून वाहतूक होत असल्याने
सदर धान्यांच्या गाड्यांवर कोणता ही गुन्हा दाखल न करण्याकरता यातील दाजी काकडे याने तत्कालीन तहसीलदार बेडसे यांच्याकरिता म्हणून तक्रारदार यांच्याकडे मासिक हप्त्याच्या स्वरूपात २५ हजार रुपये लाचेची मागणी करत ती स्वीकारण्यास संमती दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवार दि. ३ ऑगस्ट रोजी दाजी श्रीमंत काकडे रा. काकडे वस्ती, पंढरपूर रोड, मोहोळ याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, पोलिस उप अधीक्षक गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी,
उमाकांत महाडिक, पोलिस अंमलदार शिरीष कुमार सोनवणे, श्रीराम घुगे, नरोटे, गायकवाड, श्याम सुरवसे आदींच्या पथकाने कामगिरी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज