टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वरसह आसपासच्या जवळपास आठ गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, माजी उपसभापती दादासाहेब गरंडे, बागडेबाबा दूध संस्थेचे चेअरमन दादासाहेब दोलतडे यांनी अनिल सावंत यांच्या माध्यमातून मोठा पाठपुरावा केला होता.
नंदेश्वर येथील नव्याने होत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधून नंदेश्वरसह शिरसी, गोणेवाडी, खूपसंगी, खडकी, जुनोनी, सिद्धनकेरी, जालीहाळ या गावांच्या आरोग्याचे प्रश्न दूर होणार असल्याने या सर्व गावातील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
या सर्व गावातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी मागणी करत होती. तसेच या सर्व गावांनी नंदेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने व्हावे यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव दिले होते.
त्यांच्या या मागणीची दखल घेत भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांनी आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून पूर्वी असलेल्या आरोग्य उपकेंद्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर करून दिले.
यासाठी अशोक चौंडे,दादासाहेब गरंडे, दादासाहेब दोलतडे यांनी आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे याआधी पाठपुरावा केला होता.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकलो
नंदेश्वर आणि परिसरातील गावातील नागरिकांनी आरोग्याच्या समस्या संदर्भात नंदेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्याकडे लोकांच्या भावना पोहोचविल्या. तात्काळ त्यांनी या कामासाठी मंजुरी दिली. सत्ता ही लोकांच्या हिताचे काम होण्यासाठी वापरली गेली पाहिजे आणि अगदी याप्रमाणे आम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे.-अनिल सावंत, व्हाईस चेअरमन, भैरवनाथ शुगर
अनिल सावंत यांनी या कामाला मुर्तस्वरूप प्राप्त केले
गेल्या अनेक वर्षांपासून नंदेश्वर गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण आमचे नेते अनिल सावंत यांनी मात्र या कामाला मुर्तस्वरूप प्राप्त करून दिले. नंदेश्वर आणि परिसरातील गावांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत आणि अनिल सावंत यांचे प्रति मनापासून आभार व्यक्त होत आहेत.-पै.अशोक चौंडे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज