टीम मंगळवेढा टाईम्स।
उपसरपंच निवडणुकीत सरपंचाला दोनदा मतदानाचा अधिकार देणाऱ्या शासनाच्या परिपत्रकास आव्हान देणारी दुसरी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. या याचिकांवर आज न्या.मंगेश पाटील व न्या.संतोष चपळगावकर यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.
औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानदेव रोडे, कविता भोजने, लीला रोडे व मुक्तार शेख यांनी अँड सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.
राज्य शासन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आणि कक्ष अधिकारी, औरंगाबादचे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
नोव्हेंबर २०२२ च्या दुरुस्तीनुसार सरपंच जनतेतून थेट निवडला जातो. उपसरपंचाच्या निवडणुकीत समान मते पडली, तर निर्णायक मताचा अधिकार सरपंचाला दिला आहे.
ग्रामविकास मंत्रालयाच्या ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या पत्रानुसार सरपंचाला सदस्य स्टान मतदानाचा अधिकार दिला असून, समसमान मते पडली तर पुन्हा एक मत देण्याचा अधिकार दिला आहे.
सरपंच हा पदसिद्ध सदस्य आहे. त्याला उपसरपंच निवडीत दोन वेळा मतदान करता येणार नाही. सदस्य म्हणून सरपंचाने दोन वेळा मत दिले, तर ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येमध्ये २ ने वाढ होते.
४ आणि ३ असे ७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मत विभाजन झाले, ३ मते पडलेल्या उमेदवाराला सरपंचाने दोन मते दिली तर सदस्य संख्या ९ होते. त्यामुळे हा निर्णय बेकायदा आहे. असल्याचे याचिकेत म्हटले आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज