टीम मंगळवेढा टाईम्स ।
भोसे गट सर्वसाधारण झाल्यामुळे भैरवनाथ शुगर्सचे व्हा.चेअरमन अनिल सावंत हे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांच्या समर्थकांतुन बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे भोसे गटातून आपले नशीब अजमावू पाहत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे असल्यामुळे त्यांची उमेदवारी जवळ जवळ फिक्स मानली जात आहे. त्यामुळे भोसे गटाचा विकास अधिक जोमाने होण्यास मदत होणार आहे. त्यांना समविचारी आघाडीचा देखील पाठिंबा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
समविचारी आघाडीत फूट पडणार?
दरम्यान, ही निवडणूक जर पक्षाच्या चिन्हावर लढली गेली तर अनेकांना अडचणीचे ठरणार असून समविचारी आघाडीत फूट पडणार असल्याचे दिसत आहे.
समविचारी आघाडीमध्ये जास्त प्रमाणात भाजपचे पदाधिकारी आहेत त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेस आणि शिवसेना असे बलाबल असून वरीष्ठ पातळीवर जर या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवयाचे ठरले तर नक्कीच समविचारीत फूट पडणार आहे.
समविचारी आघाडीतील पदाधिकाऱ्यांची गोची होणार आहे. समविचारी आघाडी टिकवायची झाली तर पक्षाच्या विरोधात जाऊन काम करावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या नवीन आरक्षण सोडतीनुसार विद्यमान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचा भोसे सर्वसाधारण झाल्याने त्यांना अडचण नाही.
मात्र भैरवनाथ शुगरचे व्हाइस चेअरमन अनिल सावंत हे याच गटातून इच्छुक आहेत. भोसे वगळता इतर सदस्यांना पुनर्वसनासाठी गट शोधून नशीब आजमावे लागणार आहे.
मंगळवेढ्यात यापूर्वी चार जिल्हा परिषद गट अस्तित्वात होते. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नव्या प्रभाग रचनेत एका नवीन गटाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट तयार झाले आहेत.
विद्यमान सदस्य नितीन नकाते यांचा बोराळे गट आता दामाजीनगर या नावाने झाला तयार झाला आहे. नितीन नकाते यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणल्याने पुन्हा एकदा लढण्याची महत्त्वाकांक्षा होती.
गट राखीव महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांना शांत बसावे लागणार आहे. हुलजंती गटाच्या विद्यमान सदस्य शीला शिवशरण यांनी तयारी केली होती.
मात्र हा गट इतर मागासवर्गीयासाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांना संत चोखामेळानगर गटातून निवडणूक लढवावी लागेल. हा गट त्यांच्यासाठी अधिक प्रबल मानला जात आहे.
हुलजंती गटात सुरुवातीपासून असलेले लढण्यासाठी इच्छुक उद्योगपती हनुमंत दुधाळ हे प्रबळ दावेदार म्हणून पुढे येऊ शकतात. चोखामेळानगर गट अनुसूचित महिलेसाठी आरक्षित झाला.
विद्यमान सदस्या मंजुळा कोळेकर यांचे पाठखळ हे गाव चोखामेळानगर या जिल्हा परिषद गटात समाविष्ट झाले असले तरी गट राखीव झाल्याने त्यांना थांबावे लागणार आहे.
त्यामुळे या गटात प्रभावी नवीन महिला कोण असणार ? हे येणाऱ्या काळात दिसणार आहे. तर नव्याने अस्तित्वात आलेला नंदेश्वर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला असल्यामुळे
या गटातून माजी सभापती संभाजी गावकरे यांच्या पत्नी मंजुषा गावकरे निवडणूक लढवतील, अशी अपेक्षा आहे. ही निवडणूक जर पक्षाच्या चिन्हावर लढली गेली तर अनेकांना अडचणीचे ठरणार असून समविचारीत फूट पडणार असल्याचे दिसत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज