टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील बापू ज्ञानू डांगे या शेतकऱ्याच्या ८ जर्शी गायींना दि. २२ रोजी चाऱ्यातून विषबाधा झाली होती.
यातील चार गायी मृत पावल्या असून, चार गायींना वाचवण्यात पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले. मृत गायींमुळे डांगे यांचे सुमारे तीन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील बापू डांगे यांच्याकडे एकूण आठ गायी असून, त्यांनी दि. २२ रोजी दुपारी चार वाजता पाणी पाजून त्यांना शेतातील गवत आणून टाकले होते.
परंतु, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे एकापाठोपाठ चार गाभण गायी मृत पावल्या. उरलेल्या गायी देखील अस्वस्थ दिसू लागल्याने तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उपचार केले.
डॉ.सुहास सलगर, डॉ.तानाजी भोसले, डॉ.सचिन पाटील, डॉ. अविनाश वेळापूर, डॉ. गणेश जतकर यांनी उपचार केले. चाऱ्यातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी त्या पद्धतीने उर्वरित चार गायींवर योग्य ते उपचार केल्याने त्या गायींना वाचवण्यात यश आले.
बापू डांगे यांची परिस्थिती हलाखीची असून त्यांनी मोठ्या कष्टाने या गायी जोपासल्या होत्या. या चार गायी मृत झाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक अनिष्ट कोसळले आहे.
या घटनेनंतर आमदार समाधान आवताडे यांच्या वतीने माजी सभापती सोमनाथ आवताडे, सुरेश भाकरे यांनी डांगे यांच्या घरी भेट देऊन सांत्वन करीत आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज