मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीभोवती दोन दिवसांपासून निर्माण झालेला ताण, संभ्रम आणि सस्पेन्स अखेर रविवारी रात्री निवळला. राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबरची निवडणूक स्थगित करून थेट २० डिसेंबर ही नवी मतदानाची तारीख जाहीर केली.

त्यामुळे शहरातील गोंधळ थोड़ा शमला असला, तरी राजकीय वातावरणाला नव्या अनिश्चिततेची धार मिळाली आहे. वाढीव प्रचार काळाचा आर्थिक ताण उमेदवारांच्या झोपेवर परिणाम करू लागला आहे.
निवडणूक तब्बल १८ ते १९ दिवसांनी पुढे ढकलल्याने उमेदवारांचे प्रचाराचे गणित कोलमडले आहे. वाढीव दिवसांत कार्यकर्त्यांना सातत्याने सक्रिय ठेवण्याचा खर्च, कॉर्नर सभांचे नव्याने नियोजन, मतदारांशी पुन्हा-पुन्हा संपर्क साधण्यासाठी लागणारा निधी, जेवणावळी, वाहनांचा खर्च या सर्वांचा ताण एकाच झटक्यात दुपटीने वाढणार आहे.

या वाढीव कालावधीत प्रचारात किंचित ढिलाई आली तरी त्याचा थेट फटका निकालाला बसू शकतो, ही उमेदवारांची मोठी चिंता आहे. त्यामुळे लय कोसळू न देता अधिक आक्रमक मोडमध्ये जाण्यावाचून पर्याय नाही.

निवडणूक पुढे गेल्याचे समजताच अनेकांनी मतदारांना कळवण्यासाठी ‘आता मतदान २० तारखेला’ अशी स्टेटस अपडेट केली. काही बाहेरगावच्या मतदारांना मंगळवेढ्यात येऊन परत जावे लागले असून, त्याचा खर्चही उमेदवारांच्या माथी आला आहे. आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या काही उमेदवारांनी ‘चार-पाच दिवस बाहेर जाऊन खर्च वाचवण्याची’ युक्तीही आखायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मंगळवेढ्यातील निवडणूक अक्षरशः आरपारच्या संघर्षात रूपांतरित झाली होती. आता पुढील १९ दिवसांचा प्रवास ही केवळ तारखेची वाढ नसून

उमेदवारांसाठी खरी परीक्षा, खरी कसोटी आणि खरी राजकीय झुंज ठरणार आहे. शहरात पुन्हा प्रचारयुद्ध पेटण्याची चिन्हे स्पष्ट असून, २० डिसेंबरपर्यंत मंगळवेढ्याचे राजकारण तापलेले आणि थरारमय राहणार आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









