टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील साखर कारखानदारांनी पहिली उचल व संपूर्ण बिल कोल्हापूर पद्धतीने जाहीर करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्व शेतकरी वर्ग व घरनिकी गावचे उपसरपंच बालाजी गरड दिला आहे.

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील चालू गळीत हंगाम सुरू होऊन सुमारे एक महिना ते दीड महिना पूर्ण झाला असून तरी मंगळवेढा तालुक्यातील व पंढरपूर तालुक्यातील

सर्व कारखान्याने अजून पर्यंत उसाचे पहिले उचल व संपूर्ण बिलाबाबत कोणतीही घोषणा केली नसून त्यावर मंगळवेढा तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना ऊस दराविषयी कोणतीही मागणी आंदोलन होताना दिसत नाही.

सध्या साखरे दर तेजीत असून सुद्धा कारखानदार ऊस दर कमी देतात सध्या शेतकरी अतिवृष्टीमुळे व महागाईमुळे आर्थिक अडचणीत आहे.
याचा विचार करून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व कारखाने कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून उसाला चांगला दर द्यावा अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान कारखानदारांनी शेतकऱ्यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, शेतकरी मेटाकुटीला आला असून कोल्हापूर पद्धतीने दर जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यावेळी शेतकरी बापू भुसे, लखन मोरे, शुभम चव्हाण, दादासाहेब चव्हाण, विशाल मोरे, अजित पवार, राहुल इंगळे, सागर मोरे, अभिजित मोरे, नागनाथ गरड, धनाजी भुसे, दत्ता बागल, नेताजी पाटील, तानाजी गरड, अंकुश भुसे, किरण जानकर, किरण इंगळे, बापू मोरे, योगेश क्षिरसागर, वैभव मोरे आदि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













