टीम मंगळवेढा टाईम्स ।
एड्सग्रस्त मुला मुलींचे संगोपन करणाऱ्या पंढरपूर येथील प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी या प्रकल्पास आकांक्षा धनंजय हजारे हिने आपल्याला मिळालेल्या पहिल्या पगारातून ११००० रुपयाची देणगी दिली.
पालवी एक घर आहे एचआयव्ही पॉझिटिव्ह बालकांचे कोणीतरी केलेल्या चुकांचे परिणाम ही निरागस बालके भोगत आहेत.
अशा बालकांचे चेहरे प्रफुल्लित करण्यासाठी समाजाचे हात पुढे आले पाहिजेत हा विचार आकांक्षाने आपल्या कार्यातून जोपासला आहे.
आई वडिलांचे छत्र हरवलेल्या बालकांना मातृत्वाचा आधार मिळावा यासाठी लवकरच पालवीमध्ये मातृवन हा निवासी प्रकल्प उभारणार आहे.
यासाठी १२५ हून अधिक निष्पाप बालकांचे संगोपन करणाऱ्या पालवी संस्थेच्या संचालिका मंगलताई शहा यांच्याकडे सदरची रक्कम सुपूर्द करण्यात आली.
यावेळी अॅड.धनंजय हजारे, माधुरी हजारे, प्रा.विनायक कलुबर्मे,जयवर्धन हजारे उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज