मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
एकीकडे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून निर्णय घेऊ, असे शरद पवार सांगतात आणि दुसरीकडे पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी तुम्ही जे लोक रडताना पाहिले, तेच लोक प्रवेशासाठी भाजपच्या दारात उभे होते.
पवारांचा निर्णय हा वैयक्तिक आहे, असे मत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवेढा येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. कृषी उद्योजक मेळाव्यानिमित्त ते मंगळवेढ्याला आले होते.
संजय राऊत जे बोलतात ते खरे नसते. माध्यमांनी त्यांच्या बातम्या दाखवू नयेत, असे राणे म्हणाले. उद्धव ठाकरे ६ मे रोजी बारसू येथे जाणार आहेत.
त्याठिकाणी आपण जाणार आहात का, या प्रश्नावर राणे म्हणाले, की प्रकल्प कोकणात आला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. एक कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मी जाणार आहे.
तो प्रकल्प येऊ नये म्हणून सांगणारे उद्धव ठाकरे कोण, असे ते म्हणाले. सोलापुरात बेरोजगारी व विकासाचे प्रश्न आहेत. ते न विचारात घेता तुम्ही ठाकरेंचा प्रश्न अजित पवार भाजपच्या सीमारेषेवर उपस्थित करताय.
ते अडीच वर्षे कमवून बसले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. कोट्यवधी रुपयांची उलाढाल १ होणारे ४४ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात असताना शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळत नाही.
ऊस दरवाढीबाबत राज्य आणि केंद्रस्तरावर प्रयत्न करू असे राणे म्हणाले. या भागातील बँका लघु उद्योजकांना मदत करीत नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी बँकेचे प्रस्ताव आमच्यामार्फत जातात.
प्रस्ताव आणि कर्ज मंजूर करण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही प्रस्ताव तर दाखल करा मी मंजूर करून देतो, असे आश्वासन त्यांनी दिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज