मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा येत्या दोन आठवड्यांत जाहीर होतील,

म्हणजेच येत्या 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान जाहीर होतील तशी तयारी सुरू असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे.

एक निवडणूक संपताच दुसऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तर आचारसंहितेचा कालावधी वाढू शकतो.

त्याचा परिणाम विकासकामांवर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन आयोगाने तयारी सुरू केलेली आहे.

महापालिका निवडणुकाही २० जानेवारीपूर्वी उरकणार

नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केलेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पार पडत आहेत.

तसेच, आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही जाहीर केल्यानंतर साधारणतः ३० दिवसांच्या कालावधीत पार पाडल्या जाण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुका जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या संपवल्या जाण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














