टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच छत्रपती संभाजी राजे तसेच अनेक मराठा नेते एकत्रित येऊन सरकार विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत.
कोल्हापूरनंतर 16 जूननंतर आता महाराष्ट्रातील दुसरा मराठा क्रांती मोर्चा हा सोलापुरात निघणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, यावेळी मराठा समाज अत्यंत संतप्त झाल्याचं दिसून येत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार 16 जूननंतर सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे.
महाराष्ट्रातील विविध राजकीय नेते मराठा आरक्षणा संदर्भात मराठा समाजाच्या नेत्यांशी व लोकांशी चर्चा करत असल्याचं दिसून येत आहे.
त्यातच छत्रपती संभाजी राजे, उदयनराजे आणि नरेंद्र पाटील हे मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्रातील विविध भागातील वेळा आणि तारीख बैठकीतून ठरवतील अशी माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र सरकारचे एक शिष्टमंडळ उद्या मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर केंद्र सरकार मराठा समाज आरक्षणाबाबत नेमके काय पावले उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज