टीम मंगळवेढा टाईम्स ।
तब्बल चार वर्षांपासून पायावर चालता येत नव्हते, असह्य वेदनांनी ‘ती’ तळमळत होती. पायाच्या कॅन्सरवर गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या अन् एक – दोन नाही, तर तब्बल चार वर्षांनंतर ‘ती’ स्वतःच्या पायावर नीटपणे वेदनारहित चालू लागली.
पायाच्या कॅन्सरमुळे 4 वर्षे ही महिला त्रस्त होती. त्यापैकी काही वर्षे तर ती अक्षरश:अंथरुणाला खिळून होती. तिचं वय 38 वर्षे आहे. मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथील रेखा खुळे असे त्या महिलेचे नाव आहे.
कॅन्सरमुळे पायाला गाठ पडली होती. त्यामुळे चालता येत नव्हते, अखेर उपचारांसाठी मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
रेखा खुळे यांचे दैनंदिन जीवन-मान विसकळीत झाले होते. त्यांनी अनेक दवाखान्यात उपचार करून पाहिले मात्र त्यांना आजारापासून मुक्तता मिळत नव्हती.
त्यांनी सांगली, कोल्हापूर, मिरज येथील दवाखान्यात जाऊन पाहिले असता कॅन्सरची गाठ मोठी असल्यामुळे उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला होता पायाच्या कॅन्सरमुळे त्यांना प्रचंड वेदना व उभे राहता येत नव्हते, चालता येत नव्हते.
मंगळवेढा येथील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले अन् त्यांना एक जीवनदान मिळाले.
डॉ.प्रवीण सारडा व त्यांच्या टीमने तातडीने सर्व तपासण्या करून त्यांनी पायावर यशस्वी शस्त्रक्रिया केली व पेशंट अवघ्या काही दिवसातच उठून सरळ चालू लागला.
ही किमिया डॉ.प्रवीण सारडा व त्यांच्या टीमने केल्यामुळे तालुकाभर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रेखा खुळे यांना जीवदान व कुटूंबियांना मोठा दिलासा मिळाल्यामुळे त्यांनी डॉ.प्रवीण सारडा यांचे आभार मानले.
मंगळवेढेकरांच्या हक्काचे गजानन लोकसेवा हॉस्पिटल नागरिकांसाठी 24 तास सुरू असून रुग्णसेवेसाठी डॉ.प्रवीण सारडा हे 24 तास उपलब्ध असतात.
मणक्याच्या व हाडांच्या संपूर्ण शस्त्रक्रिया येथे होत असल्यामुळे नागरिकांची वेळेची व पैशाची बचत झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज