टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बँकिंग क्षेत्रामधील अग्रगण्य असलेल्या AD फायनान्शियल सर्व्हिसेस सामाजिक कार्यात मोठ्या प्रमाणात अग्रेसर असून काल झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाची आवश्यकता आहे. मंगळवेढा मधिल 72 रक्तदात्यांनी या वेळी रक्तदान केले.
एचडीएफसी बँक लिमिटेड सोलापूर (WBO) आणि ए.डी. फायनान्शिअल सर्विसेस व प्रमुख वारी परिवार यांच्या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून पंढरपूर बँक पंढरपूर ब्लड बँकेच्या सहकार्याने वाले हॉस्पिटल रक्तदान ए डी फायनान्शिअल सर्विसेस ऑफीस मध्ये शिबिराचे आयोजन केले होते.
वारी परीवार प्रमुख मधील सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र दत्तू, सचिन घुले, बँक ऑफ इंडिया शाखा मंगळवेढा मधील सचिन लेंडवे, एच.डी.एफ.सी बँक लिमिटेड सोलापूर (WBO) दीपक खंडागळे व एच.डी.एफ.सी लाइफ इन्शुरन्सचे अमित कनमुसे यांनी प्रमुख उपास्तिथी मध्ये कार्यक्रमास सुरवात झाली.
यामध्ये वारी परिवारचे सतीश दत्तू , विनायक कलूबर्मे,स्वप्नील टेकाळे, लहू ढगे, विजय हजारे, संपादक समाधान फुगारे व ए.डी. फायनान्शिअल सर्विसेसचे H.R. मॅनेजमेंट प्रमुख निरज ताड, समर्थ काशीद, दीपक शिंदे,
अजय कुमार, विक्रम पाडोळे, कृष्णा भोसले व सारिका मोरे मॅडम, स्नेहिता यादव मॅडम व सर्व स्टाफ यांचा शिबिराच्या आयोजनात विशेष सहभाग होता. सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले.
रक्तदाब, मधुमेह असलेल्या आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या ५५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीच रक्तदान करावे, अशी माहिती पंढरपूर ब्लड बँक पंढरपूरचे कार्य अधिकारी संतोष उपाध्ये यांनी यावेळी दिली.
सध्याच्या गंभीर परिस्थितीत गेल्या 2 महीन्यांपासुन रक्तदान शिबिरांची संख्या घटली होती त्यातच निवडणुक आचारसंहीतेमुळे नेते मंडळीचे असणारे कार्यक्रमावर नियमांची चौकट होती. त्यामुळे प्रचंड रक्ताचा तुटवडा संपुर्ण जिल्हा मध्ये होता.
मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असल्याने वरील सर्व सूचनांचे पालन करून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते.
सद्यस्थिती यामध्ये असलेला हा मोठा फरक लक्षात घेऊन हा सामजिक कार्यक्रम घेतला अशी माहिती ए. डी. फायनान्शिअल सर्विसेस संचालक अजय डांगे व विजय डांगे यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज