टीम मंगळवेढा टाईम्स ।
पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट, नाळ, झुंड अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटानंतर नागराज मंजुळे यांनी ‘घर बंदूक बिर्याणी’ अशा तीन वेगवेगळ्या शब्दांची गुंफण करीत एक मराठी चित्रपट निर्माण केला असून,
हा चित्रपट एकाचवेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा चार भाषांमधून दि.७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि बॉलीवूड बरोबर दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री गाजवणारे सिनेअभिनेते सयाजी शिंदे हे तिघे आज सोमवार दि.२७ मार्च रोजी मंगळवेढ्यात येत आहेत.
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते ‘घर बंदूक बिरयाणी’ या चित्रपटाचे प्रमोशन होणार आहे.
आज सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता जोगेश्वरी मिसळ हॉल, कॉलेज रोड, पंढरपूर येथे तर सायंकाळी 6.30 वाजता मंगळवेढ्यातील चोखामेळा चौकातील मारुतीच्या पटांगणात प्रमोशन केले जाणार आहे.
सायली आणि आकाश ही फ्रेश जोडी या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. आकाशने हिंदी-मराठी सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम करत आधीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
रिंकू राजगुरुसोबत त्याची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली होती. आता सायली आणि आकाश यांचा ऑनस्क्रिन रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हेमंत अवताडे दिग्दर्शित या चित्रपटामधील नागराज मंजुळे यांचा लूक अगदीच थक्क करणारा आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याने त्यांना एकत्र स्क्रीन शेअर करताना बघण्याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.
हा चित्रपट नेमका काय असणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्यावर्षीच दिवाळीच्या मुहुर्तावर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.
वेगळं नाव आणि वेगळ्या ढंगात टीझर सादर केल्याने लोकांनी त्याला पसंती दर्शवली.
सुरुवातीला हा सिनेमा ३० मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता. तशी घोषणाही करण्यात आलेली. मात्र अचानक प्रदर्शनाची तारीख बदलून ७ एप्रिल करण्यात आली आहे.
आज होणाऱ्या प्रमोशन साठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज