मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अपात्र असूनही घेणाऱ्या 1183 महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
महिला व बाल विकास विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त डेटाच्या आधारे ही यादी तयार केली असून, संबंधित जिल्हा परिषदांना कारवाईसाठी पत्र पाठवले आहे.
या योजनेनुसार, सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणारे पात्र नसतात. आता अशा महिलांच्या अडचणी वाढणार आहेत.
कारवाई करण्याचे निर्देश
महिला व बाल विकास विभागाने 1183 महिला अधिकारी/कर्मचाऱ्यांची यादी सर्व जिल्हा परिषदांना पाठवली आहे. या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक योजनेचा लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. विभागाने महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
काय होऊ शकते कारवाई?
अपात्र असूनही लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून रकमेची वसुली केली जाईल. याशिवाय, त्यांच्यावर वेतनवाढ रोखणे, पदोन्नती थांबवणे किंवा सेवेतून बडतर्फ करण्यासारखी कठोर कारवाई होऊ शकते. ही कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदांद्वारे केली जाईल, कारण जिल्हा परिषदा स्वायत्त संस्था आहेत.
योजनेचे पात्रता निकष काय?
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना 28 जून 2024 रोजी सुरू झाली, ज्यामुळे 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये (आता 2100 रुपये) मिळतात.
योजनेसाठी वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आणि आधार-लिंक बँक खाते असणे आवश्यक आहे. मात्र, सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाते योजनेसाठी अपात्र आहेत.
अपात्र लाभार्थ्यांचा शोध
माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या तपासणीत असे आढळले की, 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला, त्यापैकी 1183 महिला या जिल्हा परिषदांमधील कर्मचारी आहेत. यामुळे सरकारने कठोर पावले उचलली असून, अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज