टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी ११८ शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक चुकीचे दिल्याने ४ लाख अनुदान परत आल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मंगळवेढा तालुक्यात ऑक्टोबर अतिवृष्टी होवून पिकांचे नुकसान झाले होते. शासनाकडून या नुकसानीपोटी मंगळवेढा तालुक्याला २० कोटी ३६ लाख १८ हजार अनुदान प्राप्त झाले.
एकूण ४२ हजार नुकसानग्रस्त शेतकरी खातेदार आहेत.यापैकी ११८ शेतकऱ्यांचे खातेक्रमांक जुळत नसल्याने ४ लाख अनुदान वाटपाविना पडून आहे.
हे सर्व खातेदार आंधळगांव,अरळी, आसबेवाडी, बठाण , भालेवाडी, भोसे, ब्रह्मपुरी, डोणज, डोंगरगांव, फटेवाडी, घरनिकी, गोणेवाडी, गुंजेगाव, हाजापूर, हिवरगांव, जालिहाळ,
कचरेवाडी, कर्जाळ, कात्राळ, खोमनाळ, खुपसंगी, लक्ष्मी दहीवडी , लेंडवे चिंचाळे , माचणूर , मंगळवेढा , मारापूर , मारोळी , मुंढेवाडी , नंदून , निंबोणी , पाटखळ , रहाटेवाडी , सलगर खुर्द , सिद्धापूर , सोड्डी , तळसंगी , उचेठाण आदि गावातील आहेत.
हे अनुदान महाराष्ट्र बँकेत पाठविण्यात आले होते मात्र खाते नंबर चुकीचे असल्याने सदर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले.अनुदान वाटपासाठी महसूल सहाय्यक महावीर माळी प्रयत्न केले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज