टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरूवातीपासून थंडी गायब झाली आहे. दरम्यान हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यापासून म्हणजे 15 फेब्रुवारीपासून हिवाळा संपण्याची शक्यता आहे.
यामुळे राज्याचा पारा चढण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्हयांचे कमाल तापमान 31 वरून एकदम 35 ते 36 अंशांवर जाणार आहे. यामुळे दिवसा तसेच रात्री व पहाटेचे किमान तापमानही वाढणार आहे.
याचबरोबर मागच्या पाच वर्षांत समुद्री वादळांची संख्या वाढल्याचेही सांगण्यात आले. यंदा बंगालच्या उपसागरात असानी, मंदोस, सीतरंग ही चक्रीवादळे आली तसेच कमी दाबाचे पट्टे सतत तयार झाल्याने ढगाळ वातवरण निर्माण झाले. त्यामुळे हिवाळ्याचा कालावधी घटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
यामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ होत आहे. तापमान वाढीमुळे गारठा कमी होत आहे. तर कमाल तापमानाचा पारा देखील सातत्याने चढता आहे. आज (ता. 09) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असली तरी उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 7.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
जळगाव येथे तापमानाचा पारा 10.5 अंशांवर होता. तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान 11 ते 19 अंशांच्या दरम्यान आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 35.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, अमरावती, वर्धा येथे कमाल तापमान 34 अंशांवर होते.
पुणे 33.1 (12.4), जळगाव 33.5 (10.5), धुळे 31.0 (11.0), कोल्हापूर 33.3 (19.1), महाबळेश्वर 29.3 (15.8), नाशिक 32.3 (12.0), सांगली 33.5 (17.4), सातारा 33.6 (14.9),
सोलापूर 35.3 (18.1), रत्नागिरी 31.0 (18.5), औरंगाबाद 32.2 (11.0), नांदेड 33.4 (16.2), परभणी 33.3(14.6), अकोला 34.4(14.1), अमरावती 34.0(12.7),
बुलडाणा 31.0(15.4), चंद्रपूर 32.2 (17.4), गडचिरोली 31.6 (12.0), गोंदिया 32.5 (13.5), नागपूर 33.2 (14.2), वर्धा 34.0 (15.4), वाशिम 33.4 (16.4), यवतमाळ 33.5 (14.5).
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज