मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
पान टपरीवर काडेची पेटी आणावयास निघालेल्या बिहार राज्यातील एका २६ वर्षीय तरुणास मोटर सायकलस्वाराने जोराची धडक दिल्याने तो जागीच मयत झाला,
तर मोटर सायकलवर पाठीमागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी होता. मोटर सायकलस्वार मल्लू सिध्दाप्पा कोगानारो (रा. निंबर्गी जि. विजापूर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी लक्ष्मण शिंदे (रा. डिकसळ) यांचा मरवडे – चडचण रोडलगत राजवीर सिंमेंट पाईपचा व्यवसाय असून यातील मयत आझाद नमुद्दीन अंसारी (वय २६ रा. मधुबन बिहार ) हा पाच दिवसापुर्वीच कामाला आला.
दि.२९ रोजी सायंकाळी ७ वाजता मयत हा बालाजी नगर झाले. येथे पानटपरीवर काडेची पेटी आणण्यासाठी पायी चालत जावून परत येत असताना
एम. एच. ४६ सी. जी. – ९१०८ चा चालक मल्लू सिध्दाप्पा कोगानारो व त्याच्या पाठीमागे बसलेला जखमी इसम आहे. सचिन श्रीमंत कवलगी हे वीट भट्टी कामासाठी जात असताना
मयतास जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी होवून जागेवर मयत झाले. तर पाठीमागे बसलेले सचिन कवलगी हे गंभीर जखमी मोटर सायकलस्वार तथा आरोपी याने जखमींना उपचाराकरिता न नेता मोटर सायकल जाग्यावर सोडून पळून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले.
या घटनेचे वृत्त समजताच बोराळे बीटचे पोलीस हवालदार महेश कोळी यांनी घटनास्थळी भेट देवून मयताच्या कुटूंबियास बिहार येथे व्हिडीओ कॉलींगव्दारे संपर्क करुन मयताची ओळख पटवून दिली. तसेच मृतदेह तात्काळ रात्री शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे आणण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज