टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील शेटयाप्पा आण्णा कोळी याने जात पंचायतीने आमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकून तीन लाख रुपये दंड केला असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली असून पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर न्याय दयावा अशी मागणी केली आहे.
शेटयाप्पा कोळी यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की,हॅटसन अॅग्रो प्रोडक्ट लि. या कंपनीबरोबर दि.29/1/2021 रोजी सदर कंपनीचा वाया जाणारा माल गोळा करण्याचा करार केला होता.
तसेच तक्रारदाराच्या सोबत रावसाहेब शामू मरीआईवाले यांनीही करार करून वाया जाणारा माल उचलत होते. ही वस्तूस्थिती असताना दि.23 जुलै रोजी रावसाहेब मरीआईवाले खुपसंगी,मारुती कोळी मरवडे यांनी
अचानकपणे सदरचा माल उचलू नका नाहीतर तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे तक्रारी अर्जात कोळी यांनी नमूद करून याबाबतची शिवीगाळी,दमदाटी केल्याची तक्रार पोलिसात दिली होती.
सदर दोन्ही व्यक्तींनी मिळून वरील लोकांनी अन्य लोकांना हाताशी धरून माइया कुटुंबाला मंदिरासमोर बोलावून आमच्या कुटुंबावर सर्व समाजाला बहिष्कार टाकण्याचा आदेश देवून तीन लाख रुपये दंड केला आहे.त्यामुळे माइया कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केल्याने समाजातील व्यक्ती व्यवहार अगर संपर्क करीत नाहीत.
त्यामुळे माइयावर व माइया कुटुंबावर मानसिक आघात होवून कुटुंब खचले जात आहे.व उपासमारीची वेळ येत असल्याचे तक्रारी अर्जात नमूद करून पोलिसांनी याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करून मला न्याय दयावा असे तक्रारीत म्हटले आहे.
जीवन जगणे व गावात रहाणे अशक्य झाले
समाजाने मला व माइया कुटुंबियांना बहिष्कृत केल्याने कुठलाही संपर्क ठेवत नसल्यामुळे मला जीवन जगणे व गावात रहाणे अशक्य झाले आहे.याचा आमच्या कुटुंबियांना लोकशाहीत मानसिक त्रास भोगावा लागतो आहे.
याची तक्रार दि. 7 जुलै रोजी पोलिसाकडे दिली असून अदयापही चौकशी झाली नसून चौकशी होवून योग्य तो न्याय मिळावा.-शेटयाप्पा कोळी,मरवडे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज