टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुम्ही आमचे घेतलेले 20 हजार रुपये दया असे म्हणून 42 वर्षीय महिलेला मारहाण करून साडी ओढून तीच्या
मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले तसेच तीच्या दीरास लोखंडी गज व बेल्टने मारहाण केल्याप्रकरणी
अंकुश गरंडे, लक्ष्मण गरंडे, वसंत गरंडे, नाना गरंडे, तानाजी गरंडे, आण्णा गरंडेब(सर्व रा.नंदेश्वर) या सहा जणांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सायंकाळी 7.00 वा.फिर्यादी तीचे पती व दीर असे तीघेजण मोटर सायकलवरून घराकडे जात असताना
वरील आरोपीने बोलेरो गाडीत येवून तुम्ही माझे घेतलेले 20 हजार रुपये दया असे म्हणाल्यावर फिर्यादी हे त्यांना आम्ही तुमचे पैसे थोडे थोडे करून दिलेले आहेत.
परत कशाचे पैसे असे म्हणत असताना आरोपीनी फिर्यादीच्या दीरास पाठीवर, कमरेवर, मांडीवर, डाव्या हातावर, मनगटावर मारून गंभीर जखमी केले.
यावेळी घाबरून फिर्यादीचे पती घाबरून निघून गेले. सदरची भांडणे सोडवा सोडवी करीत असताना फिर्यादीस आरोपीनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून
साडी ओढून तीचे मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज