टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांच्या भेटीप्रसंगी गैरहजर असलेले मंगळवेढा शिक्षण विभागातील मुख्याध्यापकासह ११ जणांना विनावेतन का करण्यात येवू नये अशा आशयाची नोटीस शिक्षण विभागाने बजावून तीन दिवसात खुलासा मागविण्यात असल्याचे शिक्षण विभागाचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान एकाच वेळी ११ जणांना विना वेतन कारवाईच्या नोटीसा दिल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दि.१५ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांनी अचानक मंगळवेढा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कार्यालयास भेट दिली असता
समग्र शिक्षा अभियानाचे ९ कर्मचारी गैरहजर असल्याचे पाहणीत दिसून आले. त्याचबरोबर उचेठाण येथील जि.प.शाळेला सकाळी ११.०० वा भेट दिली असता तेथील २ शिक्षक गैरहजर असल्याचे व शाळाही बंद असल्याचे निदर्शनास आले.
यावरून प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार यांनी याबाबत मंगळवेढयाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे यांना तात्काळ कारवाई करण्याचे फर्मान काढले होते.
त्यानुसार या ११ जणांना कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या नोटीसमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार यांनी कार्यालयास व शाळेस भेट दिली असता आपण गैरहजर असल्याचे दिसून आले असून याबाबत तीन दिवसाच्या आत खुलासा करावा खुलासा न केल्यास विनावेतन कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा करून सकाळी ९ .३० ते सायंकाळी ६.०० कार्यालयीन वेळ ठरवून दिली अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचारी हे ९ .३० ला कार्यालयात न येता मनमानी पध्दतीने कार्यालयात येत असल्याने काम घेवून आलेल्या नागरिकांना त्यांची प्रतिक्षा करत थांबावे लागत असल्याचे चित्र आहे.
बरेचसे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात न राहता पंढरपूर , सांगोला, सोलापूर इतर अन्य गावातून दररोज अप-डाऊन करीत असल्याने ते वेळेत येवू शकत नसल्यामुळे याचा परिणाम शासकीय कामकाजावर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या असून डॉ . लोहार यांनी दिलेल्या भेटीवरून ते कर्मचारी उशीरा येत असल्याचे उघड झाले आहे.
जि.प.चे तत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी दिली स्वामी यांनी कोरोनामुळे बंद झालेले बायोमॅट्रिक प्रणाली चालू करून उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगाम घालावा अशी मागणी पुढे येत आहे.
पंचायत विभागाला शिक्षण गटशिक्षणाधिकारी नसल्यामुळे याचा कारवाई प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यावरच गेली अनेक वर्षापासून सुरु आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज