टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील मित्रनगर मध्ये एका शिक्षकाचा भरदिवसा चोरट्यांनी बंगला फोडून कपाटात ठेवलेले 6 लाख 43 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेला असून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान भरदिवसा घरफोडीचे प्रमाण वाढत असून या मोठ्या चोरीमुळे चोरटे शोधने पोलीसांना एक आव्हान ठरले असून जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीषकुमार देशपांडे यांनी येथे लक्ष घालून वाढत्या चोर्या रोखाव्यात अशी मागणी शहरवासीयांमधून अग्रक्रमाणे पुढे येत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी बिभीषण धोेंडीराम गवळी (वय 47 रा.मित्रनगर) हे पेशाने शिक्षक असून ते व त्यांच्या पत्नी ज्योत्सना दि.25 रोजी सायंकाळी 4 वाजता दोघेजण घराला कुलूप लावून भालेवाडी येथील शेतात जवस काढावयास गेले होते.
रात्री 7.45 वाजता फिर्यादी व त्यांची पत्नी घरी आले तेव्हां गेटला लावलेले कुलूप काढून दोघेजण घराच्या मेन दरवाज्याजवळ गेले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. फिर्यादीने बेडरुम मध्ये जावून पाहिले असता लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला, कपडे अस्ताव्यस्त पडले होते.
लोखंडी कपाटात ठेवलेले रोख 55 हजार तसेच 1 लाख 60 किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या,60 हजार किंमतीचा सोन्याचा लक्ष्मी हार, 1 लाख किंमतीच्या सोन्याचे घंटन,1 लाख 20 किंमतीचे सोन्याचे घंटन, 60 हजार किंमतीचे जुबे,
40 हजार किंमतीची सोन्याची एक चेन,20 हजार रुपये किंमतीची सोन्याची नथ, 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी,8 हजार रुपये किंमतीचे सोन्याच्या पीळ्याची अंगठी असा एकूण 6 लाख 43 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान अनेक दिवसापासून चोरटयाने भर दिवसा घरफोड्या करण्याचा सपाटा लावला असल्याने नागरिक धास्तावले असून या वाढत्या चोर्यामुळे बाहेरगावी जाणे मुश्किल झाले असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
पोलीस प्रशासनाने यापुर्वी रात्रीच्यावेळी पडलेल्या दरोड्यातील चोरटे जेरबंद केले आहेत. मात्र आत्तापर्यंत भरदिवसा चोरट्यांनी केलेल्या घरफोडीतील चोरटे जेरबंद करण्यात अजूनतरी पोलीसांना यश न आल्याने चोरट्यांचे मनोबल वाढून भरदिवसा चोर्या करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची चर्चा नागरिकामधून होत आहे.
चोरटे हे भरदिवसा कुलूपबंद घरालाच टार्गेट करत असल्याने पोलीस प्रशासनाने यापुर्वी नागरिकांना ग्रामसुरक्षा यंत्रणेवरुन बाहेरगावी जाताना दागिने सुरक्षित ठेवण्याबाबत आव्हान केले होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज