mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी! 20 दिवसात 5 जणांचा मृत्यू; सुनेने विषप्रयोग करून पती, सासू-सासऱ्यासह केली हत्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 19, 2023
in क्राईम, राज्य
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स। 

क्राईम पेट्रोल या शो मध्ये गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना कथित स्वरुपात पहायला मिळतात. मात्र, क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी प्रत्यक्षात घडली आहे. गडचिरोली येथे 20 दिवसात 5 जणांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. 2 महिलांनी पूर्ण कुटुंब सपंवल आहे. पोलिसांनी या दोघी महिलांना अटक केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील महागाव येथे एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृत्यूचे कोडे उलगडले आहे. अन्नपाण्यात विष मिसळून पाच जणांची हत्या करण्यत आली आहे. सून आणि मामीचे हे दुष्कृत्य आहे. 20 दिवस विषप्रयोग सुरु होता. यांचा हत्येचा प्लान पाहून पोलिसही हडबडले आहेत. या दोघींना अटक करण्यात आली आहे.

आधी पती- पत्नी, नंतर विवाहित मुलगी, त्यानंतर मावशी व नंतर मुलगा अशा पध्दतीने 20 दिवसांत लागोपाठ पाच जणांच्या रहस्यमय मृत्यूने अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) हादरुन गेले होते. अखेर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून यामागे थंड डोक्याने केलेल्या हत्येचा कट पुढे आलाय. अन्नपाण्यात विष मिसळून या पाचही जणांना संपविल्याचे समोर आले. सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हे पाऊल उचलले.

शंकर तिरुजी कुंभारे (५२), विजया शंकर कुंभारे, त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी), मावशी आनंदा उराडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) आणि मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) अशी मृतांची नावे आहेत. सून संघमित्रा रोशन कुंभारे (२५) आणि रोशनची मामी रोजा रामटेके (५२) या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे.

काय घडलं नमेकं?

शंकर कुंभारे यांचे महागाव येथे टिंबर मार्टचे दुकान आहे. २२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर विजया शंकर कुंभारे यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्याने पती शंकर तिरूजी कुंभारे यांनी त्यांना चंद्रपूरला नेले.त्यानंतर शंकर यांचीही प्रकृती खालावली.

दोघांनाही उपचारादरम्यान नागपूरला हलविले. उपचार सुरु असताना २६ रोजी शंकर तर २७ रोजी विजया यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी आली होती. प्रकृती खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले.

शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (२८) याचा १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याची मावशी आनंदा उंदीरवाडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती. चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली. लागोपाठ होणाऱ्या मृत्यूसत्रानंतर अहेरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय असल्याचे स्पष्ट झाले.

संघमित्रा ही मूळची अकोला येथील आहे. ती बीएस्सी ऍग्री सेकंड टॉपर आहे. ती व रोशन हे पोस्ट खात्यात सोबत काम करत. तेथेच त्यांचे सूत जुळले. डिसेंबर २०२२ मध्ये त्या दाेघांनी विवाह केला. ते एकाच जातीचे आहेत,

पण प्राध्यापक वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. त्यांना पक्षाघात झाला व नंतर एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर संघमित्रा व रोशन यांच्यात विसंवाद निर्माण झाला. सासरचे लोक छळ करत असल्याने त्यांना संपविण्याचा कट तिने रचला. रोशनची मामी रोजा रामटेके महागावातच राहते.

रोशनला तीन मावशी आहेत. रोजा रामटेके हिच्या पतीच्या नावे असलेल्या चार एकर जमिनीवर रोशनची आई विजया यांच्यासह इतर तीन बहिणींनी दावा सांगितला होता, त्यामुळे तिच्या मनातही राग होता. यातून या दोघींनी मिळून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याचा कट अतिशय थंड डोक्याने आखल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

संघमित्रा कुंभारे हिने इंटरनेटवर सर्च करुन विना रंगाचे, दर्प न येणारे व हळूहळू शरीरात भिनणारे घातक द्रव परराज्यातून मागवल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. दोघी आरोपींनी नॉनव्हेज, डाळीतून तसेच पिण्याच्या पाण्यात विषारी द्रव मिसळले व ते टप्प्याटप्प्याने कुटुंबातील लोकांना दिले. २० दिवसांत घरातील पाच जणांचा या विषप्रयोगात बळी गेला.

सध्या या प्रकरणात 3 जणांवर उपचार सुरू आहेत. रोशनच्या आई- वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी ( रा.महागाव ) याच्यावर नागपूर, रोशनचा मावसभाऊ बंटी उंदीरवाडे (रा.बेझगाव ता.मूल जि.चंद्रपूर) याच्यावर चंद्रपूर व रोशनचा भाऊ राहुल हा दिल्लीत उपचार घेत आहे.

या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या संपूर्ण कटात आणखी काहींचा सहभाग असल्याने त्याविषयी पोलीस तपास करत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: हत्याकांड

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
Next Post
प्रांताधिकारी यांची कसून चौकशी सुरू, लाचखोर नळे प्रकरण गाजनार; अँटी करप्शन अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाचे पुरावे? मोठा मासा गळाला लागणार

Dream11! अखेर 'त्या' कोट्यधीश PSI वर कारवाई; 1.5 कोटी जिंकल्याचं आनंद लोकांना सांगायला गेला अन् फसला

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 15, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा