मंगळवेढा टाईम्स न्युज ।
रस्त्याच्या बाजूला घराजवळ मोटार उभी करून बोलत थांबलेले असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाने तिघांना उडवले असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे.

ही घटना काल गुरुवार दि.11 डिसेंबर रोजी सायंकाली 6.30 वाजण्याच्या सुमारास मरवडे ते उमदी जाणारे रस्त्याचे डाव्या बाजूलगत हरी जाधव यांचे घराजवळ घडली आहे.
याप्रकरणी संजय उमाजी चौगुले (वय 47 रा. खुपसंगी) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात MH-13-BN-0134 या कारवरती गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे नातेवाईक दादा बाबा शेळके (वय 49), छाया दादा शेळके (वय 45) व मनिषा बापू शेळके (वय 41) सर्व रा. खुपसंगी ता. मंगळवेढा

हे मरवडे गावचे हद्दीतील मरवडे ते उमदी जाणारे रस्त्याचे डाव्या बाजूलगत हरी जाधव यांचे घराजवळ त्यांची मोटार सायकल क्र. MH-13-DL-5471 ही उभी करून बोलत थांबलेले असताना

त्यांना मरवडे कडून उमदीकडे जाणारे चारचाकी कार क्र. MH-13-BN-0134 चालकाने वाहन भरधाव वेगात चालवून धडक देऊन गंभीर जखमी करून दादा बाबा शेळके यांचे मरणास कारणीभूत झालेला आहे व जखमींना उपचाराकरीता घेऊन न जाता निघून गेलेचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे

या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीमंत पवार हे करत असून 1031/2025 BNS कलम 281, 106(1), 125(a), 125(B), MV Act- 184, 134 (A)(B) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













