mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रेमाचा भयंकर शेवट! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात; नेमकं घडलं काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 8, 2025
in क्राईम, राज्य, सोलापूर
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

कोल्हापुरातील जोतिबाच्या डोंगरात पत्नीची गळा चिरून हत्या करून पती थेट सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात हजर झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चारित्र्यावर संशय आल्याच्या कारणावरून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

शुभांगी राजपूत असं मृत महिलेचं नाव असून, तिचा पती सचिन राजपूत (रा. बागलकोट, कर्नाटक) हा आरोपी आहे. सचिन हा सैन्यातून बडतर्फ झालेला असून, त्याच्यावर कर्नाटकमध्ये पूर्वीचा एक गुन्हाही नोंद आहे.

नेमकं घडलं काय?

प्राथमिक माहितीनुसार, सचिन आणि शुभांगी हे देवदर्शनासाठी कोल्हापुरातील जोतिबाच्या डोंगरावर गेले होते. मात्र, दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाल्यानंतर सचिनने अज्ञातस्थळी पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून गळा चिरत तिची हत्या केली.

पत्नीचा खून केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला आणि दुचाकीवरून थेट सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले.त्याने पोलिसांना संपूर्ण घटना सांगत पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी तत्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर आरोपीला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सोलापूर आणि कोल्हापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

चारित्र्याच्या संशयावरून वाद

दोघेही कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्याचे रहिवासी असून, देवदर्शनाच्या निमित्ताने कोल्हापूरला आले होते. मात्र, धार्मिक स्थळी जाण्याऐवजी त्यांच्यात चारित्र्यावरून वाद झाला. वाद वाढल्याने सचिनने जोतिबाच्या डोंगर परिसरात पत्नीला दुचाकीवरून एका अज्ञातस्थळी नेले आणि धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा खून केला.

खून केल्यानंतर तो कोल्हापुरातून दुचाकीवरून सोलापुरात आला आणि फौजदार चावडी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. पोलिसांसमोर त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली. यामुळे पोलीस दलातही एकच खळबळ उडाली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोल्हापूर मर्डर

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

ब्रेकिंग! सोलापूर झेडपी अध्यक्षपदाचा पेच सुटणार? पालकमंत्र्यांकडे सर्वांच्या नजरा; ‘ही’ नावे आहेत सर्वात पुढे

March 16, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

काळीज पाषाणाचं! जन्म देताच माता-पित्यांचे पलायन; सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 15, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

मंगळवेढ्यात ‘सोन्या’चा नवा खेळ! बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय?; बँकांचे धाबे दणाणले; बँका, पतसंस्थांनी सावध राहणे गरजेचे

March 15, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

March 15, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मुलींच्या मोफत शिक्षणात अडथळा? मंत्र्यांनी बजावला इशारा; होणार कारवाई; मुलींच्या शुल्काची लूट थांबणार; विधानसभेत मोठी घोषणा

March 15, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

कामाची बातमी! अ‍ॅट्रोसिटी कायद्यात महत्त्वाचा बदल; आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, ‘या’ नंतरच कारवाई

March 14, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकर सावधान! घरगुती गॅस सिलेंडर वापरताना ‘ही’ चूक पडेल महागात; व्यावसायिक वापर आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

March 14, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! मंगळवेढ्यात माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला; लोखंडी साखळी अन् केबलने बेदम मारहाण, मोबाईलही लुटला

March 14, 2026
Next Post
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

ब्रेकिंग! सोलापूर झेडपी अध्यक्षपदाचा पेच सुटणार? पालकमंत्र्यांकडे सर्वांच्या नजरा; ‘ही’ नावे आहेत सर्वात पुढे

March 16, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

काळीज पाषाणाचं! जन्म देताच माता-पित्यांचे पलायन; सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 15, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

मंगळवेढ्यात ‘सोन्या’चा नवा खेळ! बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय?; बँकांचे धाबे दणाणले; बँका, पतसंस्थांनी सावध राहणे गरजेचे

March 15, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

March 15, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मुलींच्या मोफत शिक्षणात अडथळा? मंत्र्यांनी बजावला इशारा; होणार कारवाई; मुलींच्या शुल्काची लूट थांबणार; विधानसभेत मोठी घोषणा

March 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..