टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या आषाढी यात्रेदरम्यान पंढरपुरात १५ ते २० लाख भाविक येत असतात. पंढरपुरात आलेल्या विठ्ठल भाविक वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भाजपा सरकार कॉरिडॉर करणार असल्याचे भाजपाच्या नेत्या निर्मला सीतारामन यांनी भाषणातून स्पष्ट केले आहे.
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. भाजपकडून पक्ष निरीक्षक म्हणून निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी आले आहेत. याप्रसंगी सीतारामन बोलत होत्या.
पंढरपूर हे जागतिक पातळीवरील सुप्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र असल्याने तिथे रोज हजारो भाविकांची वर्दळ असते. त्याचबरोबर पंधरा दिवसांची एकादशी व महिन्याच्या एकादशी या दिवशी लाख भाविक, तर माधी व चैत्री या यात्रांना किमान ४ ते ५ लाख भाविक, त्याचबरोबर कार्तिकी व आषाढी यात्रेदरम्यान ८ ते २० लाखांपर्यंत भाविक पंढरपुरात येतात.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी व त्याही अगोदर पंढरपुरात कॉरिडॉर करणार, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते.
तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी पंढरपूर कॉरिडॉरसाठी तीनशे कोटी रुपये दिले, अशी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु विधानसभा निवडणूक होताच निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात पंढरपूर येथे कॉरिडॉर करून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केले आहे.
दर्शन रांगेचा कालावधी…
या भाविकांना चांगल्या प्रतीच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या. वारीच्या काळात निर्माण होणाऱ्या समस्यांवर ठोस उपाय झाले पाहिजेत. दर्शन रांगेचा कालावधी कमी करण्याबाबत विचार होणार आहे.
गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये. आणखीन ज्यादा पंढरपुरात भाविकांची आवक वाढावी. यामुळे पंढरपूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. या अनुषंगाने पंढरपुरात विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर होणे गरजेचे आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज