टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतात केलेली जुनी पाइपलाइन आम्हाला शोधून दिली नाही, आमच्या शेजारी जमीन का घेतली? म्हणून कॉलर पकडून
दगडाने व काठीने मारहाण केल्याप्रकरणी बापलेकावर मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्याद म्हाळू सोमा वाघमोडे वय ५८ रा . सप्तशृंगी नगर मंगळवेढा यांनी दिली. ही घटना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धर्मगाव रोडवर मंगळवेढा शिवारात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी फिर्यादी म्हाळू सोमा वाघमोडे यांनी ३ वर्षापूर्वी विठ्ठल नामदेव गोवे यांच्याकडून सात एकर जमीन खरेदीने घेतली.
दि.४ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धर्मगाव रोडवरील शेताकडे मोटारसायकलवरून जात असताना कॅनॉलवर संशयित आरोपी संजय राजाराम सावंत रा. मंगळवेढा व त्याचा मुलगा दोघे बसले होते.
यावेळी आमच्या शेतात असलेली जुनी पाइपलाइन तुला माहिती असताना आम्हाला शोधून देत नाही व शेजारी जमीन घेतली, म्हणून कॉलर पकडून दगडाने व काठीने मारहाण करून जखमी केले.
यादरम्यान फिर्यादीचा मुलगा रितेश यांनी देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद म्हाळू सोमा वाघमोडे यांनी दिली आहे.
दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ श्रीमंत पवार करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज