टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच मंगळवेढा दौऱ्यावर येत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे यांनी दिली.
बुधवार दि.6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिलीप धोत्रे यांच्या प्रचार्थ शिवप्रेमी चौक आठवडा बाजार येथे जाहीर सभा होणार आहे.
विधानसभेच्या आखाड्यामध्ये उमेदवार उतरण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली त्याचवेळी पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिल्या पाच उमेदवारात दिलीप धोत्रे यांचे नाव निश्चित केल्यामुळे या निवडणुकीच्या आखाड्यात रंगत निर्माण झाली.
दिलीप धोत्रे यांनीही या मतदारसंघात अधिक सक्रिय होत मतदारसंघातील प्रश्नावर आवाज उठवण्याची भूमिका सुरू केली.विशेषता राज ठाकरे यांनी पंढरपूर मतदारसंघांमध्ये वैयक्तिक लक्ष घातले असून गत महिन्यामध्ये तालुक्यातील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेस युवासेना अध्यक्ष अमित ठाकरे हे उपस्थित राहिले.
कुस्ती बरोबर त्यांच्या स्वागताला मंगळवेढेकरांनी मोठी गर्दी केली. त्यानी नुकतीच उमेदवारी अर्ज भरताना बिरोबा (हुन्नूर),महालिंगराया(हुलजंती), दामाजी(मंगळवेढा), संत चोखामेळा (मंगळवेढा) व विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणुकीच्या अगोदर मतदार संघातील नागरिकांना काशी, आयोध्या, तुळजापूर, कोल्हापूरची, आदमापूरला या ठिकाणचे तिर्थ यात्रा घडवून आणली याशिवाय मुस्लिम बांधवांना अजमेर, बौद्ध बांधवांना दीक्षाभूमी नागपूर यात्रा काढून दर्शन घडवले.
पाच वर्षाच्या कार्यकाळात महाविकास आघाडी व महायुती सत्तेत राहण्याचा योग मिळाला मात्र मतदारसंघातील प्रमुख प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे त्या प्रश्नावर आवाज उठवण्यास सुरुवात केली राज ठाकरे पहिल्यांदा मंगळवेढा दौऱ्यावर येत आहेत.
त्यामुळे 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे या दौऱ्यात राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार याकडे मात्र लक्ष लागले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज