टीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राची परीक्षा ५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान विद्यापीठाद्वारे आयोजिली आहे. यात ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न पद्धतीच्या परीक्षेत सहभागी होऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मागील सत्राचे बॅकलॉगचे विषय राहिले असतील तर त्या परीक्षांचेही आयोजन करण्यात आले आहे. याचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे. Punyashlok Holkar of Solapur University
मागील सत्रापैकी कोणतीही बॅकलॉग परीक्षा राहिली असली तरी ती विद्यार्थ्यांनी द्यायची आहे. मात्र बॅकलॉग विषयांच्या परीक्षेचे फॉर्म विद्यापीठाकडे भरले होते, असे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. ज्यांनी बॅकलॉग परीक्षेचे फॉर्म भरले नाहीत असे विद्यार्थी या बॅकलॉग परीक्षेला बसू शकत नाहीत.
अंतिम सत्रातील परीक्षेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा पोर्टल बनविले आहे. या पोर्टलचे लॉग इन विद्यार्थ्यांच्या ई-मेल तथा मोबाईलवर मेसेजद्वारे 29 सप्टेंबरपर्यंत पाठविले जाणार आहेत.
लॉग इन न मिळाल्यास www.pahsu.org या पोर्टलवरून स्वत:चा पीआरएन क्रमांक टाकून आणि मोबाईल ओटीपीच्या माध्यमाने पासवर्ड रिकव्हर करता येणार आहे.
हा पीआरएन नंबरच विद्यार्थ्याचा युजर नेम असणार आहे. 5 ते 28 ऑक्टोबरदरम्यान परीक्षा घेतली जाणार असून, आठवड्यात निकाल जाहीर केला जाणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने 31 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून 1 नोव्हेंबरपासून पहिल्या सेमिस्टरचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत.
तिथून चार महिन्यांत 5 एप्रिलपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा. 1 ते 8 ऑगस्ट 2021 पर्यंत परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सुटी द्यावी. 9 ते 21 ऑगस्टपर्यंत अंतिम वर्षाची परीक्षा घ्यावी.
30 ऑगस्ट 2021 पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात करावी, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. तत्पूर्वी, यंदाची अंतिम वर्षाची परीक्षा 5 ते 28 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घरबसल्या ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत.
त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. अंतिम सत्राची परीक्षा आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांचीही परीक्षा ऑनलाइनच घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रात होते, ते सर्व विद्यार्थी बॅकलॉग विषयांची परीक्षा देऊ शकतात.
मात्र, त्यासाठी त्यांनी विद्यापीठाकडे अर्ज केलेले असावेत, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन परीक्षा सुरू असता नेटवर्क गेल्यास परीक्षा खंडित होऊ शकते.
परंतु, प्रत्येक पेपर हा 90 मिनिटांचा असणार आहे. मोबाईलचे नेटवर्क गेल्यास पाच तासांत कधीही पेपर सोडविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पेपर संपल्यानंतर आठवड्यात निकाल लावण्याची तयारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केली आहे.
ऑनलाइन परीक्षा सुरू असता नेटवर्क गेले तरी खंड नाही
कोणत्याही कारणाने परीक्षा खंडित झाल्यास, नेटवर्क गेल्यास,आपला स्लॉट संपण्यापूर्वी पुन्हा लॉगिन करून परीक्षा पूर्ण करता येईल. परीक्षा जिथे थांबली तेथूनच सुरू होईल. परीक्षा खंडित होण्यापूर्वी सोडवलेले प्रश्न पुन्हा सोडवण्याची गरज पडणार नाही.
निर्धारित वेळेच्या आत पुन्हा लॉगिन करून परीक्षा पूर्ण करावी लागेल. प्रत्येक पेपर हा ९० मिनिटांचा असेल.मात्र आपल्याला वेळापत्रकात दिलेल्या ५ तासांच्या स्लॉटमध्ये कधीही ९० मिनिटांचा हा पेपर सोडवता येईल.
ऑनलाइन परीक्षा देणे शक्य झाले नाही तर अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन
काही कारणास्तव ऑनलाइन परीक्षा देणे शक्य झाले नाही तर अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफ लाइन पद्धतीने नियोजित वेळापत्रकानुसार नंतर संबंधित महाविद्यालयांना घ्यायच्या आहेत. ही परीक्षासुद्धा बहुपर्यायी प्रश्न या तत्त्वावर घेण्यात येईल.
विद्यापीठातर्फे महाविद्यालयांना ओएमआर शीट्स देण्यात येतील. सोडविलेल्या उत्तरपत्रिका तपासल्यानंतर त्याचे निकाल जाहीर करण्यात येईल.
यामध्ये ऑफलाइन परीक्षेचे निकाल लागण्यास उशीर होण्याची शक्यता राहील. – डॉ.मृणालिनी फडणवीस,कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
Punyashlok Holkar of Solapur University final year online examination will be conducted in ‘Ya’ method; Exams between 5th and 28th October
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज