मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळं 25 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 6 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. आज (रविवार) मुंबईतील महापालिकेच्या रूग्णालयात एका 40 वर्षीय महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांची राज्यातील संख्या 193 वर जाऊन पोहचली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे.
देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या 1045 वर जाऊन पोहचली आहे तर मृत्यूची संख्या 26 वर गेली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांकडून देखील कोरोनाच्या पार्श्वभुमीवर युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत.दरम्यान, सांगली जिल्हयातील इस्लामापूरमध्ये 3 दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा देखील बंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 193 वर
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचं थैमान सुरुच आहे. लॉकडाऊननंतरही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 193 वर पोहचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). आज मुंबईत 4, जळगावमध्ये 1, सांगली 1, नागपूर 1 असे रुग्ण सापडले. यामुळे आरोग्य यंत्रणांच्या काळजीत वाढ झाली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आता राज्य सरकारने खासगी रुग्णालयांची मदतही घेण्यास सुरुवात केली आहे. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?
मुंबई – 77
पुणे – 24
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर – 12
कल्याण – 7
ठाणे – 5
नवी मुंबई – 6
यवतमाळ – 4 (यवतमाळ येथील 3 रुग्ण चाचणी निगेटीव्ह )
अहमदनगर – 3
सातारा – 2
कोल्हापूर – 1
गोंदिया – 1
पनवेल – 2
उल्हासनगर – 1
वसई विरार – 4
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
पुणे ग्रामीण- 1
पालघर- 1
जळगाव- 1
इतर राज्य (गुजरात) – 01
एकूण 193
कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?
कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू- 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)
पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)- 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू (1)- 26 मार्च
गुजरात – दोघांचा मृत्यू (2)- 26 मार्च
बुलढाणा – 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू – 28 मार्च
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज