समाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे त्यात मंगळवारी दिलासादायक आकडेवारी समोर आली असून आज 298 रुग्णांची भर पडली आहे तर तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.यामध्ये पंढरपूर शहरातील डाळे गल्ली येथील 20 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
मागील काही दिवसांमध्ये आजची संख्या ही सर्वात कमी असल्याचे अहवालावरुन दिसून येते. त्याचे कारण म्हणजे आज करण्यात आलेल्या चाचण्यांचे प्रमाणही कमी आहे. कदाचित यामुळे बाधितांची संख्या कमी आली असण्याची शक्यता आहे.
आज एकूण 2 हजार 143 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1 हजार 845 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 297 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 194 पुरुष आणि 104 महिलांचा समावेश आहे. त्याचबरोबर आज कोरोनामुक्त झाल्यामुळे 297 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत 24 हजार 672 जण कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर 669 जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधित झाल्यामुळे वेगवेगळ्या दवाखान्यात 6 हजार 395 जण उपचार घेत आहेत तर कोरोनामुक्त होऊन 17 हजार 608 यामध्ये ( 10 हजार 439 पुरुष तर 7 हजार 1 69 महिला) जण आपापल्या घरी सुखरूप पोहोचले आहेत.
आज ‘या’ गावातील तीन जणांचा बळी
पंढरपूर शहरातील डाळे गल्ली येथील 20 वर्षाचे पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथील 65 वर्षीय महिला व माढा तालुक्यातील चिंचगाव येथील 66 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या व कंसात मृत्यू
मंगळवेढा-1 हजार 143 (23),सांगोला- 1 हजार 824 (22),पंढरपूर- 4 हजार 782 (115),मोहोळ- 1 हजार 42 (49),दक्षिण सोलापूर- 1 हजार 252 (34),अक्कलकोट- 1 हजार 22 (57), बार्शी- 4 हजार 534 (147), करमाळा- 1 हजार 866 (37), माढा- 2 हजार 463 (78), माळशिरस- 4 हजार 59 (78), उत्तर सोलापूर- 685 (29), एकूण- 24 हजार 672 (669)
In rural Solapur today, 298 new corona positive and three deaths
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज