मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । बेळगावमध्येही कोरोनाचा धोका वाढत असल्याचं दिसून येत आहे. आज पुन्हा शहरातील 4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बेळगावमध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 14 झाला आहे. हे चारही रुग्ण रायबाग कुडची परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे.
त्यातील एक जण दिल्लीमध्ये पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजर राहिला होता. त्याच्या कुटुंबीयांना ही लागण झाल्याची माहिती मिळत आहे. हा रुग्ण आणखीन कोणाकोणाला भेटला यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज