टीम मंगळवेढा टाईम्स । उचेठाण येथील भिमा नदीपात्रात अंदाजे सात वर्षीय मुलीचे कुजलेल्या अवस्थेत प्रेत सापडून जवळपास 9 दिवसाचा कालावधी उलटूनही अदयाप कोणीच नातेवाईक न मिळाल्याने आता पुढील तपासासाठी डी.एन.ए.चाचणी केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी दिली.
दि. 21 मे रोजी सायंकाळी 5.00 वा. भिमा नदी पात्रात कुजलेल्या अवस्थेत अंदाजे सात वर्षीय मुलीचे प्रेत तेथील ग्रामस्थांना नजरेस आले होते. याची खबर पोलिस पाटलांनी दिल्यानंतर सी.आर.पी.सी.174 प्रमाणे नोंद पोलिसांकडे घेण्यात आली होती. या प्रेताचे पोस्ट मार्टम केले आहे मात्र केवळ हाडाचा सापळा राहिल्यामुळे नेमकी घटना कशामुळे घडली याचे शवविच्छेदनानंतरही अपेक्षित अहवाल मिळू शकला नाही.
या घटनेचे प्रसार माध्यमातून वृत्त प्रसिध्द झाले होते. जवळपास 9 दिवसाचा कालावधी उलटूनही कुठलेच नातेवाईक पोलिस स्टेशनला फिरकले नसल्यामुळे नेमकी या मुलीचे प्रेत कुठले आहे? याची पोलिसांना उकल झाली नाही पोलिसांनी अधिक तपासासाठी मोहोळ,पंढरपूर,इंदापूर,माळशिरस,अकलूज व अन्य पोलिस स्टेशनला याचा संदेश देवून माहिती घेण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे.
मुलीच्या अंगावरील पुराव्यासाठी केवळ कपडे शिल्लक बाकी आहेत.अधिक तपास घेण्यासाठी मुलीची डी.एन.ए.चाचणी करण्यात येणार असून पोलिसांनी त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे.परिसरातील नागरिकांनी या मुलीबाबत कोणास माहिती असल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन तपासिक अंमलदार तथा स.पो.नि.भगवान बुरसे यांनी केले आहे.
Relatives of unknown girl not found DNA test decision mangalwedha police
—————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज