mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात विठाई परिवार मल्टिस्टेटचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर थिरकल्या भगिनी; पैठणी, फॅन अन् रोख बक्षिसांचा पडला पाऊस; ‘गोल्डन स्टार ग्रुप’ ठरला दांडिया चॅम्पियन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 19, 2026
in मंगळवेढा, मनोरंजन
मंगळवेढ्यात विठाई परिवार मल्टिस्टेटचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर थिरकल्या भगिनी; पैठणी, फॅन अन् रोख बक्षिसांचा पडला पाऊस; ‘गोल्डन स्टार ग्रुप’ ठरला दांडिया चॅम्पियन

टीम ​मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):

मंगळवेढा येथील नामांकित ‘विठाई परिवार मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.’ यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘भव्य दांडिया स्पर्धा’, ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ आणि ‘लकी ड्रॉ’ अत्यंत दिमाखदार व उत्साही वातावरणात पार पडला.

काल रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी काटकर हॉस्पिटल शेजारी, दुर्गामाता नगर येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यास मंगळवेढा शहर व परिसरातील महिलांनी विक्रमी गर्दी केली होती.

​कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. अंजलीताई आवताडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले, तर अध्यक्षस्थान मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुनंदाताई आवताडे यांनी भूषवले.

संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष स्वप्नील प्रभू काळुंगे व समस्त विठाई परिवाराच्या वतीने या भव्य उपक्रमाचे नेटके संयोजन करण्यात आले होते.

​विविध क्षेत्रांतील ९ ‘नवदुर्गां’चा विशेष सन्मान

​समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या ९ कर्तृत्ववान महिलांचा विठाई परिवाराच्या वतीने ‘नवदुर्गा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला:

​सौ. दयाताई वाकडे – साहित्य क्षेत्र
​सौ. सुनिता चवरे – पोलीस प्रशासन
​सौ. सुषमाताई सुतार – शिक्षण क्षेत्र
​डॉ. सौ. मंजिरी आसबे – वैद्यकीय सेवा
​ॲड. सौ. अपर्णाताई जाधव – विधि व न्याय क्षेत्र
​सौ. अरुणाताई माळी – व्यवसाय क्षेत्र

​सौ. मनीषाताई मिसाळ – कृषी प्रशासन
​सौ. निकीताताई जाधव – सूत्रसंचालन व निवेदिका
​कु. पूजाताई चव्हाण – क्रीडा क्षेत्र
​बक्षिसांची लयलूट आणि विजेत्यांची यादी
​कार्यक्रमात विविध स्पर्धा व लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांना रोख पारितोषिके व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

​गरबा दांडिया स्पर्धा विजेते:

​प्रथम क्रमांक (₹ १०,०००/-): गोल्डन स्टार ग्रुप
​द्वितीय क्रमांक (₹ ७,०००/-): सुपर रॉकिंग वुमन ग्रुप
​तृतीय क्रमांक (₹ ५,०००/-): सुपर मॉम ग्रुप
​’होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ विजेत्या:
​प्रथम क्रमांक (पैठणी): सपना साळुंखे
​द्वितीय क्रमांक (फॅन): रेश्मा इनामदार
​तृतीय क्रमांक (इस्त्री): आशा पाटील

​लकी ड्रॉ विजेत्या:

​प्रथम बक्षीस (पैठणी): श्वेता सतीश मोरे
​द्वितीय बक्षीस (फॅन): श्रेया जावीर
​तृतीय बक्षीस (इस्त्री): दिपाली विठ्ठल ताटे

​या दिमाखदार सोहळ्यास पंचायत समितीच्या सभापती सौ. दिपालीताई ताड, उद्योजिका सौ. सुप्रियाताई जगताप यांच्यासह नगरपरिषदेच्या सर्व महिला नगरसेविका आणि मान्यवर महिलांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. महिलांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे मंगळवेढ्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली त्यांनतर मान्यवरांचे सत्कार संपन्न झाले व त्यांनतर नवदुर्गांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

कार्यक्रम अध्यक्षा सुनंदा आवताडे म्हणाल्या की, विठाई परिवार मल्टिस्टेट ने महिलांच्या कलागुनाना वाव देण्याचे अनमोल कार्य केले आहे.नवदुर्गांचा सत्कार करून महिलांच्या कार्याचा सन्मान केल्यामुळे त्यांच्या पुढील कार्यास अजून बळ दिले आहे.

अंजलीताई आवताडे मॅडम म्हणाल्या महिलांना दिलेल्या ह्या संधीमुळे महिला सक्षम होतील तसेच त्यांच्याकडील कालागून विकसित होतील व आज खरच सर्व महिलांना नवीन रूपात पाहून नवरात्री असल्यासारखे वाटले..
दया वाकडे मॅडम म्हणाल्या विठाई परिवार मल्टिस्टेट खूप छान कार्य करत असून त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे त्यांचे आर्थिक सोबत सामाजिक कार्य खूप मोलाचे आहे त्यांनी समाजासोबत जोडलेली कार्यामुळे आज विठाई परिवाराचे नाव सर्वदूर पसरले असून त्यांचा एकूण व्यवसाय टप्पा १५० कोटी पूर्ण झाला आहे.

पूजा चव्हाण यांनी विठाई परिवार ने एका कर्तबगार व होतकरू मुलीने केलेल्या कार्याचा सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

सुषमा अनिल सुतार मॅडम यांनी विठाई परिवार ने केलेल्या सन्मानाचे आभार मानून विठाई परिवार मल्टिस्टेट खुप मोठे कार्य करेल व भविष्यात अजून खूप मोठे नाव होईल अशा शुभेच्छा दिल्या..
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिताताई जाधव यांनी केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

October 19, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अत्यंत हृदयद्रावक! शेतकरी बापाची उच्चशिक्षित लेक हरपली; उपचारादरम्यान काशिशची प्राणज्योत मालवली; मंगळवेढ्यात काळाचा क्रूर घाव

October 19, 2026
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 19, 2026
मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026

ताज्या बातम्या

शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न

October 19, 2026

जमिनीच्या तुकड्यासाठी नात्यांचा खून! सासर्‍याने सुनेच्या डोक्यात घातला कुऱ्हाडीचा दांडा; सासूने दिली थेट जिवे मारण्याची धमकी

October 19, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अत्यंत हृदयद्रावक! शेतकरी बापाची उच्चशिक्षित लेक हरपली; उपचारादरम्यान काशिशची प्राणज्योत मालवली; मंगळवेढ्यात काळाचा क्रूर घाव

October 19, 2026
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 19, 2026
मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..