टीम मंगळवेढा टाईम्स :
मंगळवेढ्याच्या राजकारणात आज एक मोठी राजकीय घडामोड घडत असून, नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्यासह पाच नगरसेवक आज, शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

तालुक्याचे ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे आणि युवा नेते सिद्धेश्वर आवताडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा गट भाजपमध्ये सामील होत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

तीर्थक्षेत्र आघाडीला मोठा धक्का
गेल्या वर्षी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या तीर्थक्षेत्र आघाडीला या निर्णयामुळे मोठा राजकीय धक्का बसला आहे.

आवताडे गटाच्या या पावलामुळे मंगळवेढा तालुक्यात भाजपची ताकद कित्येक पटीने वाढणार असून संपूर्ण राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाऊल
मंगळवेढ्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि शहराच्या विकासाला गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

यामध्ये प्रामुख्याने:
नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळवणे,
तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करणे
भूमिगत गटार योजना व नियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवणे
आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणे
सत्तेच्या माध्यमातून ही सर्व विकासकामे मार्गी लावण्याच्या उद्देशानेच हा पक्षप्रवेश होत असल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष या राजकीय घडामोडीकडे लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













