टीम मंगळवेढा टाईम्स ।
अनिता काळुंगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवेढा शहर आक्रमक झाले असून, या घटनेविरोधात आजपासून शहरात व्यापक पातळीवर ‘सह्यांची मोहीम’ राबवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारी रात्री शहरातील शिवप्रेमी चौकातील शिवतीर्थावर सर्व समाजातील नागरिकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला विविध समाजांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणी कोणताही अनुचित प्रकार न घडवता पूर्णपणे शांततेच्या व लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

आमदारांच्या सूचनेनंतरही माफीनामा नाही आमदार समाधान आवताडे यांनी नगरसेवक यांना जाहीर माफीनामा देण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, आमदारांच्या सूचनेनंतरही नगरसेवक यांनी अद्याप माफी मागितली नाही.

या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या विविध समाजांतील नागरिकांनी एकत्र येत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली.

बैठकीतील प्रमुख मागण्या:
दाखल करण्यात आलेल्या खोट्या ॲट्रॉसिटीच्या तक्रारी त्वरित मागे घेण्यात याव्यात.
संबंधित नगरसेवकाने जाहीर माफीनामा सादर करावा.
या बैठकीत उपस्थित समाजबांधवांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पुन्हा एकदा आमदार समाधान आवताडे यांची भेट घेणार असून, न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











