मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा सोलापूर विमानतळावरील कामादरम्यान झालेला दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला आहे.
निशांत राजकुमार सुरवसे (वय २६, रा. सिद्धार्थ नगर, कुमठे, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. निशांत गुरुवारी सकाळी ९:३० वाजता ईगल कंपनीकडून सोलापूर विमानतळावर सुरू असलेल्या डेव्हलपमेंटच्या कामावर गेला होता.

तेथे सहकारी कामगार राम पुकाळे हायमास्टचे केबल काढत होता. केबल न निघाल्याने निशांतने वायर हलवून काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, जवळच असलेल्या जेसीबी (क्र. एमएच-१३ डीवाय-५३६७) वरील खोऱ्यातील दगड अचानक खाली पडून निशांतच्या डोक्याला जबर मार लागला. तो गंभीर जखमी झाला.

तेथील कामगारांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. निशांतचे वडील पर्वीच वारले असून आई, पत्नी व लहान मुलाचा आधार तोच होता.

लग्न होऊन अवधी दोन वर्षे झाली होती. दिवसा विमानतळावर हेल्परचे काम आणि संध्याकाळी रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
विमानतळावर सुरू असलेल्या खोदाईच्या कामासाठी कोणतीही सुरक्षितता साधने उपलब्ध नसल्याचे सहकारी कामगारांनी सांगितले.

निशांत सुरवसे मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. गुरुवारी शवविच्छेदनानंतर संबंधित कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी सांगितले.

पत्नीने डबा घेऊन जाण्यास सांगितले
काल बुधवारी सकाळी पाणी आले होते. निशांतने स्वतः मुलाला अंघोळ घातली होती. जेवणाचा डबा तयार झाला नव्हता. पत्नीने डबा घेऊन कामावर जावा असा आग्रह केला. मात्र, एक दिवस डबा नेला नाही तर मरणार नाही, असे म्हणून तो कामावर निघून गेला. मात्र, तो कायमचाच निघून गेला, अशी हळहळ कुटुंबीय व्यक्त करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















