मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार घटस्फोटित सुनेच्या ताब्यातील घर जागा सासू-सासऱ्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिले आहेत.
बार्शी येथील रहिवासी लता अनिल शिंदे व पती अनिल गुरुनाथ शिंदे या ज्येष्ठ नागरिक दांपत्याने त्यांचे स्वकष्टार्जित मालकीचे बिन शेती जमीन गट नं-१३४०/२ अ पैकी प्लॉट नं-३० या टू-बीएचके बांधकामासह असलेली

घर जागा घटस्फोटित सुनेच्या ताब्यातून राहण्यास मिळणेवबाबत उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम-२००७ मधील कलम-५ अन्वये अर्ज दाखल केला होता.

आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७च्या या अर्जावर न्यायिक चौकशी होवून प्रांत यांनी दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिक दांपत्यास सुनेच्या बेकायदेशीरपणे ताब्यात असलेल्या घराचा ताबा देण्याबाबतचे आदेश झाले होते.

या आदेशाच्या विरोधात सुनेने कलम-१६ (१) अन्वये विरोधात तथा यांच्या सासू-सासऱ्यांच्या जिल्हाधिकारी जिल्हादंडाधिकारी न्यायालयात स्थगिती अर्जासह अपील दाखल केले होते.

परंतु जेष्ठ नागरिक असलेल्या सासू व सासऱ्यास सुनेकडून घर जागेचा ताबा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी देऊन उपविभागीय अधिकारी प्रांत यांचा आदेश कायम ठेवला आहे. यावेळी ज्येष्ठ-नागरिक सामनेवाला यांच्यावतीने अॅड. गजशिव, अॅड. काशिद यांनी काम पाहिले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













