मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्याच्या ग्रामीण भागात जुगाराने पाळेमुळे रुजवली आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. अनेक जण देशोधडीला लागत आहेत. यापूर्वी या जुगारात कर्जबाजीरपण आल्यामुळे अनेकांनी आपली पत्नी आणि लहान-लहान मुले मागे सोडून टोकाचं पाऊल उचलले आहे.

दरम्यान चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरमध्ये एका सावकाराने कर्जाचे पैसे वसूल करण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा वेदनादायी प्रसंग ओढवला आहे. या शेतकऱ्याचं नाव आहे रोशन सदाशिव कुडे. ते चंद्रपूर जिल्हातील मिंथुर गावातील रहिवाशी आहेत.

शेतीसोबड जोडधंदा म्हणून त्यांनी दुग्धव्यवसाय करण्याच ठरवले. त्यासाठी त्याने दोन सावकाराकडून 50-50 हजार असे एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. मात्र खरेदी केलेल्या गाई मरण पावल्यात.
सावकराच्या कर्जाचा डोंगर उतरवण्यासाठी शेतकऱ्याने गाठला एजंट
उत्पन्न नाही मात्र कर्जाचा डोंगर वाढत गेला. सावकार घरी येऊन नको ते बोलू लागलेत. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली. ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकले. मात्र कर्ज काही संपेना शेवटी कर्ज घेतलेल्या सावकारने किडणी विकण्याचा सल्ला दिला.

अखेर सावकरांच्या कर्जाचा डोंगर उतरवण्यासाठी शेतकऱ्याने एजंट गाठला. एजंटने कंबोडिया येथे जाऊन शस्त्रक्रिया करत किडनीकाढली ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली.

सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल
अखेर किडनी विकल्या प्रकरणी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्या आधारे पोलिसांनी आरोपीं विरोधात अवैध सावकारी, खंडणी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक, आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह पथक नागभीड येथे ठाण मांडून बसले आहे.

सहा आरोपींपैकी सध्या चार आरोपींना अटक झाली आहे. फिर्यादी रोशन कुडे याची सध्या वैद्यकीय तपासणी केली जात असून किडनी विकल्याचं निष्पन्न झाल्यास या प्रकरणी देखील स्वतंत्र चौकशी करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी दिली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













