मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सामाजिक कार्याची आवड असणारे प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते व पवार वस्ती कडलास जि.प. प्राथमिक शाळेचे सहशिक्षक संजय काशिद-पाटील यांचा सोनंद येथील घरी विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष, सांगोला तालुका शिक्षक सोसायटीचे संचालक व निस्पृह मार्गदर्शक,

कुशल संघटक संजय नारायण काशीद (वय ५०, सध्या रा.वासुद रोड, सांगोला) हे ९ डिसेंबर रोजी सकाळी गावाकडे (सोनंद, ता. सांगोला) येथे शेतातील कामानिमित्त गेले असता सकाळी ९ च्या सुमारास विजेचा शॉक बसल्याने जमिनीवर पडले.

दरम्यान नातेवाईकांच्या मदतीने त्यांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

काशीद गुरुजी यांच्या निधनाची वार्ता शिक्षण क्षेत्रात पसरताच सांगोला ग्रामीण रुग्णालयासमोर शिक्षकांनी एकच गर्दी केली होती. सदर घटनेची पोलिसात खबर देण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

मुलीचे लग्न काही दिवसांवर आल्याने शेतातील कामासाठी काढली होती रजा
मुलीचे लग्न काही दिवसावर आल्याने शेतीची व घरातील काही कामे करून घेण्याच्या दृष्टीने एक दिवसाची रजा टाकून काशिद पाटील हे त्यांचे मूळ गाव सोनंद येथे गेले होते. त्यावेळी सकाळी लवकर शेतातील काम संपवून घरातील बाथरूम मध्ये हातपाय धुण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा धक्का बसला.

नातेवाईकांच्या मदतीने त्यांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














