मंगळवेढा टाईम्स न्युज ।
राज्यात येत्या ५ तारखेला सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळेत शिक्षक येणार नसल्याची शक्यता आहे. परिणामी राज्यातील शाळा बंद राहतील.
पुण्यातील बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाचा निर्णय झाला आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे.या मागण्या पूर्ण होत नसल्याचे संपाचा इशारा दिला आहे.

शिक्षकांच्या मागण्या काय?
राज्यातील २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये.१५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावे.

शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी. या मागण्यांसाठी मुख्याध्यापक राजव्यापी संपाचा इशारा दिला आहे.
टीईटी परीक्षा अनिवार्य करु नये, ही मुख्याध्यापक महामंडळाची मुख्य मागणी आहे. आता राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. जर टीईटी परीक्षा दिली नाही किंवा परीक्षा पास झाली नाही

तर त्या शिक्षकांना काम करता येणार नाही. दरम्यान, आता ही परीक्षा सर्व शिक्षकांना देणे बंधनकारक केले आहे. हा निर्णय रद्द व्हावा, यासाठीच संपाचा इशारा दिला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













