मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ दरम्यान न्यायालयीन प्रलंबित अपिलांवर राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा थेट परिणाम नगरपालिकेवर झाला आहे. न्यायालयात अपील प्रलंबित असल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली असून, केवळ नगरसेवकांच्या निवडणुका पूर्ववत होतील, अशी अधिकृत माहिती मिळाली असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविले की, ज्या जागांवर जिल्हा न्यायालयात अपील दाखल आहे किंवा सुनावणी पूर्ण झाली असली तरी आदेश उपलब्ध नाहीत, अशा जागांसाठी २६ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करता आले नाही.

नामांकन छाननीनंतर घेतलेल्या निर्णयांविरुद्ध उमेदवारांनी दाखल केलेल्या अपिलांमुळे काही जागांवरील प्रक्रिया न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून ठरली आहे. त्यामुळे त्या विशिष्ट पदांवरील निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत रद्दबातल राहणार आहे.

याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर न्यायालयीन स्थगिती लागू झाली. कारण या पदासाठी दाखल तिहेरी अपिलांवर सुनावणी प्रलंबित असल्याचे आयोगाला कळविण्यात आले होते. परिणामी होणारे चिन्ह वाटप नगराध्यक्षपदासाठी घेण्यात आले नाही.
तथापि, नगरसेवकांच्या सर्व १० प्रभागांवरील निवडणुका नियोजित कार्यक्रमाप्रमाणेच होतील, अशी पुष्टी निवडणूक आयोगाच्या पत्रातून झाली आहे.

नगराध्यक्षपद वगळता उर्वरित सर्व पदांवर निवडणूक प्रक्रिया पूर्ववत सुरू राहणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. ४ नोव्हेंबरला जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमादरम्यान अनेक ठिकाणी छाननीवरील वाद निर्माण झाले होते.

त्यानंतर आयोगाने २६ व २७ नोव्हेंबर रोजी सलग दोन आदेश काढत न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांवर निवडणूक स्थगितीचे निर्देश जारी केले आहेत.
आयोगाच्या पुढील आदेशानंतर नवीन कार्यक्रम जाहीर करू
निवडणूक आयोगाची काल गुरुवारी व्हीसी झाली असून बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत ज्या अपिलावर सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागला नाही, अशा ठिकाणाची निवडणूक थांबवण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

त्यानुसार नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक थांबवली असून आयोगाच्या पुढील आदेशानंतर नवीन कार्यक्रम जाहीर करू.- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











