मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा शहराचा कायापालट व्हावा, सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागावेत, जनतेचे राहणीमान उंचावले पाहिजे हा विकासाचा अजेंडा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनंदा बबनराव आवताडे यांनी प्रसिध्द केला आहे.
वचननामा
पहिल्याच मिटींग मध्ये ५०० चौरस फुटांच्या आतील मिळकतदारांना मालमत्ता करात सवलत देण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवणार.

थकित मालमत्ता कर, गाळे भाडे या वरील दंड व व्याज माफ करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार.
नगरपालिका गाळे हस्तांतरीत (ट्रान्सफर) प्रक्रिया सुलभ करणार. नगरपालिकेच्या सर्व शॉपिंग सेंटर चे नूतनीकरण करून त्याठिकाणी शौचालयाची व्यवस्था करणार.

ठेकेदारीतील सफाई, पाणीपुरवठा तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटर या सर्वच कर्मचाऱ्यांना कायम करणेबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार.
प्रधानमंत्री घर योजना यामध्ये नगरपालिका स्वहिस्सा म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये अनुदान देणार.

महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी नगरपालिका स्तरावर पन्नास हजार अनुदान देणार. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार करण्याची ग्वाही.
शहरातील सर्व भागांना शुद्ध व पुरेसे पाणी उच्च दाबाने मिळावे यासाठी आवश्यकतेनुसार नियोजन करण्यात येईल.

मंगळवेढा नगरपरिषदेची पाणीपट्टी कमी करणार. संत चोखामेळानगर व संत दामाजीनगर, संत कान्होपात्रानगर या लगतचा भाग हद्द वाढ करुन, हद्द वाढ होईपर्यंत या सर्व भागांना नगरपालिकेच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणार.
नगरपालिका प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी भौतिक सुविधा तसेच आधुनिक डिजीटल शैक्षणिक साधने उपलब्ध करुन देण्यात येतील.

मंगळवेढ्यातील सर्व खेळाडूंसाठी शहरालगतच भव्य आणि सुसज्ज असे क्रिडा संकुल निर्माण करणार.
मंगळवेढा शहरातील गणेश उद्यानाचे सुशोभीकरण व आधुनिकीकरण करणार. शहरातील नविन आठवडा बाजारामध्ये पार्किंगची व विशेषतः महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था करणार.
शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहराच्या विविध भागात उपकेंद्रांची उभारणी करण्यात येईल.
गटार व सांडपाणी व्यवस्थापनासाठी भूमिगत गटारे तसेच गरजेनुसार अन्य पर्यायी व्यवस्था करण्यात येतील.

रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व डास मुक्त मंगळवेढा व्हावे यासाठी नियमित फवारणी तसेच सांडपाणी व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येईल.
सार्वजनिक ठिकाणावरील कचरा विल्हेवाट व घरगुती घनकचरा व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील व आवश्यकतेनुसार घंटागाडींची संख्या वाढविण्यात येतील.
शहरातील उद्योग – व्यवसाय वाढीस लागावेत त्यादृष्टीने संतभूमीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येईल.
महात्मा बसवेश्वर, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा व अन्य संतांची स्मारके व समाधीस्थळ विकसित करुन पर्यटकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
धूळमुक्त, प्रदुषणमुक्त व खड्डेमुक्त शहर अशी ओळख मंगळवेढा नगरीची होईल यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल असे सुनंदा आवताडे यांनी जाहीरनाम्यातून सांगितले आहे.
विकासाचा अजेंडा घेऊन काम आणि सेवेची आवड असलेल्या उमेदवारांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेल्या आहेत.
येणाऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सुनंदा आवताडे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












