मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या १९ जागांसाठी ५८ उमेदवारी अर्ज आखाड्यात शिल्लक राहिले. निवडणुकीची खरी लढत तीर्थक्षेत्र विकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातच होणार आहे. मात्र, आखाड्यातील अपक्ष उमेदवाराची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीत काल शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची शेवट तारीख होती. विधानसभेच्या निवडणुकीत तिसऱ्या उमेदवारामुळे निवडणुकीचा निकाल काय लागतो, याचा अनुभव घेतल्यामुळे आखाड्यातील अन्य अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत,

यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी नगरपालिकेत दुपारी तीन वाजेपर्यंत ठाण मांडले आणि आपापल्या प्रभागातील अपक्ष व अन्य पक्षीय उमेदवारांना गळाला लावून अर्ज मागे घेण्याचे नियोजन केले.
नगराध्यक्षसह १७ जागा भाजपने तर राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा लढवल्या. तीर्थक्षेत्र विकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उबाठा, शिवसेना यांच्या माध्यमातून उमेदवार उभे केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी कोंडूमैरी व अपक्ष उमेदवार प्रा. तेजस्विनी कदम या दोघींनी अर्ज मागे घेतल्यामुळे सुनंदा आवताडे व सुजाता जगताप यांच्यात सरळ लढत होणार आहे.

असे असले तरी राजामती कोंडूभैरी यांच्या अर्जाने ही लढत तिरंगी झाली. काही प्रभागांत राष्ट्रवादी श.प. पक्षाचे उमेदवार आखाड्यात आहेत. सर्वाधिक उमेदवार हे प्रभाग ९ मध्ये तर सर्वांत कमी उमेदवार प्रभाग चारमध्ये आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भाजपने प्रचाराचा प्रारंभ यापूर्वीच केला, अजित जगताप यांच्या राजकीय कार्याच्या जोरावर सुप्रिया जगताप निवडणूक प्रचाराला लागल्या तर सुनंदा आवताडे या बबनराव आवताडे व सिद्धेश्वर आवताडे यांच्या राजकीय कर्तृत्वाच्या जोरावर सध्या प्रचारामध्ये सक्रिय झाल्या,

प्रभाग 3 मधील भाजप उमेदवार सोमनाथ आवताडे यांच्या विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून भारत नागणे यांचा अर्ज होता, तो माधार घेण्याची चर्चा काल दिवसभरापासून शहरात होती. त्यामुळे काल भारत नागणे काय भूमिका घेतात, यासाठी नगरपालिका परिसरात अनेक भाजप समर्थक लक्ष ठेवून होते.

अखेरीस त्यांनी दुपारी अडीच वाजता नगरपालिकेत येऊन अर्ज मागे घेतल्याने सोमनाथ आवताडे यांच्या बिनविरोधाचा मार्ग मोकळा झाला, तर काही अपक्ष व पक्षीय उमेदवारांना राजकीय तडजोडीमुळे अर्ज मागे घेतले.
तीर्थक्षेत्र विकास आघाडीने शहरात प्रथमच महादेव धोत्रे यांना उमेदवारी दिली. दामाजी कारखान्याच्या निवडणुकीप्रमाणे नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने एक जागा बिनविरोध करून आपले खाते उघडले.
येत्या काही दिवसांतील घडामोडी या नाट्यमय असतील. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. नगरपालिकेच्या निकालानंतर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्याच्या निवडणुकांची समीकरणे बांधली जाणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










