मंगळवेढा टाईम्स : संपादक – समाधान फुगारे
मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना आमदार समाधान आवताडे यांचे बंधू सोमनाथ आवताडे यांच्या विरोधात प्रभागात रिंगणात असलेल्यांनी माघार घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

यासोबतच भाजपने मंगळवेढ्यात आपले खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून सोमनाथ आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

त्यांच्या विरोधात 2 उमेदवारांनी अर्ज भरला होता. परंतु आज विरोधातील सर्वांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सोमनाथ आवताडे हे बिनविरोध निवडून आले आहेत.


या निवडीनंतर मंगळवेढा नगरपालिकेत भाजपचे खाते उघडले आहे. मंगळवेढा ही ‘क’ दर्जाचे नगरपालिका असून याठिकाणी 10 प्रभाग आहेत. 20 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.


महाराष्ट्रात सर्वांत लहान नगरपालिका म्हणून या नगरपालिकेची ओळख आहे. सोमनाथ आवताडे यांच्या विरोधातील सर्व अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे सोमनाथ आवताडे हे बिनविरोध निवडले गेले आहेत.


मंगळवेढा नगरपालिकेतील निवडणूक यंदा विशेष चर्चेत होती, कारण सोमनाथ आवताडे पहिल्यांदाच नगरपालिका निवडणूक लढवत होते. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने त्यांचा विजय सहज झाल्याचे दिसून आले.


त्यामुळे मंगळवेढा नगरपालिकेतील निवडणूकप्रक्रिया आणि त्यातील राजकीय हालचालींबाबत स्थानिकांमध्ये चर्चेला अधिक उधाण आले आहे.


राज्यात याआधीही अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणुका पार पडल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये भाजपचे सर्व 17 उमेदवार नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेत.


अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










