मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या १९ अर्जापैकी नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख उमेदवारांनी परस्परविरोधी हरकती घेतल्या होत्या. हरकतीचा युक्तिवाद नगरपालिकेत तब्बल दोन तास चालला. रात्री उशिरा तहसीलदार मदन जाधव यांनी निकाल दिला. या निकालानुसार अखेर नगराध्यपदाचे सर्व उमेदवार वैध ठरले.

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १९ तर सदस्य पदासाठी १६० उमेववारी अर्ज दाखल झाले. सदस्य पदाचे २० अर्ज नामंजूर करण्यात आले. १३८ अर्ज मंजूर करण्यात आले.
दोन सदस्यांबाबत हरकती होत्या. त्यांनाही नंतर पात्र ठरवण्यात आले. नगराध्यक्ष पदाच्या स्थानिक विकास आघाडीच्या उमेदवार सुनंदा अवताडे यांच्या मुलाची नगरपालिकेत दोन कामे सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात या कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रार झाल्यानंतर सदर पदावरील व्यक्ती त्यावर कठोर भूमिका घेऊ शकतील का? याबाबत प्रश्नचिन्ह असल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द बातल करावा असा युक्तिवाद विरोधकाकडून करण्यात आला.

तर भाजपच्या उमेदवार सुप्रिया जगताप या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शिवाय अपत्यांवरून हरकत घेऊन अर्ज रद्द बदल करावा असा युक्तिवाद विरोधी गटाकडून करण्यात आला. त्यावर जगताप यांच्या वकिलाने मंगळवेढयात न्यू इंग्लिश स्कूल नावाची कोणतीही संस्था अस्तित्वात नाही.

त्यामुळे तो मुद्दा लागू होत नाही, शिवाय त्यांनी त्या नोकरीचा दिलेला राजीनामा संस्थेने मंजूर केला. याशिवाय अपत्याबाबतचा कोणताही सबळ पुरावा विरोधकाकडे नसून केवळ फोटोवरून अपत्याचा मुद्दा ठरवता येणार नाही, असा युक्तिवाद मांडला,
त्यावर तहसीलदारांनी रात्री उशिरा निकाल देऊन जगताप यांना पात्र ठरवले. अॅड. नीलेश ठोकडे, अॅड. गवई, अँड. इरफान सय्यद, अॅड. गुरुराज बुरकूल, अॅड. प्रतिक बुरकूल यांनी काम पाहिले, याशिवाय प्रभाग सहा मधील भाजपच्या अर्जातील त्रुटीमुळे रागिनी कांबळे यांचा अर्थ त्रुटीमुळे अपात्र ठरला,

तेजस्विनी कदम व आशा जगताप यांच्या भाजप चिन्हावरील तर क्रांती दत्तू (शिवसेना उबाठा) तर सुवर्णा चाळेकर (काँग्रेस) यांचा अर्जाला पक्षाचा अधिकृत ए. बी. फॉर्म नसल्यामुळे रह झाला. त्यामुळे त्यांनी अपक्ष भरलेले अर्ज रिंगणात आहेत.
सदस्यांचे प्रभाग निहाय अपात्र अर्ज पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक कंसात अर्ज संख्या २ (२), ३ (३), ५ (५), ६ (२), ७(५), ८ (२) ९ (१).
नगराध्यक्षपदाचे उमेदवार
नगराध्यक्ष पदासाठी शुभांगो कोंडूभैरी (राष्ट्रवादी श. प), सुप्रिया जगताप (भाजप), सुनंदा अवताडे, तर अपक्ष म्हणून तेजस्विनी कदम, प्रणाली अवताडे, माधवी किल्लेदार, क्रांती दत्तू, अरुणा माळी, सुवर्णा चेळेकर, राजामती कोंडभैरी, माधुरी कट्टे, संगीता कट्टे, राजश्री चेळेकर, हे रिंगणात आहेत.

तहसील कार्यालयात वकिलांची फौज
नगराध्यक्षपदाच्या अर्जावरील हरकतीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात तालुक्यातील वकिलाची फौज मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाला न्यायालयाचे स्वरूप आले होते.(स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














